Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

मलाखी 4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


परमेश्वराचा दिवस येत आहे

1 पाहा, भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे; सर्व गर्विष्ठ व सर्व दुराचारी धसकट बनतील; तो येणारा दिवस त्यांना जाळून टाकील, त्यांचे मूळ, फांदी वगैरे काहीच राहू देणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

2 पण तुम्ही जे माझ्या नावाचे भय धरणारे त्या तुमच्यावर न्याय्यत्वाचा सूर्य उदय पावेल, त्याच्या पंखांच्या ठायी आरोग्य असेल; तुम्ही गोठ्यातल्या वत्सांप्रमाणे बाहेर पडून बागडाल.

3 तुम्ही दुष्टांना तुडवाल; कारण मी हे करीन त्या दिवशी ते तुमच्या पायांच्या तळव्यांखाली राखेप्रमाणे होतील, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

4 माझा सेवक मोशे ह्याला सर्व इस्राएलसाठी म्हणून होरेबात मी दिलेले नियमशास्त्र, म्हणजे अर्थात नियम व निर्णय ह्यांचे स्मरण ठेवा.”

5 पाहा, परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलीया संदेष्ट्याला तुमच्याकडे पाठवीन.

6 तो वडिलांचे हृदय त्यांच्या पुत्रांकडे व पुत्रांचे हृदय त्यांच्या वडिलांकडे वळवील; नाहीतर कदाचित मी येईन आणि भूमीला शापाने ताडन करीन.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan