Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

इय्योब 26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


ईयोब देवाच्या सार्वभौमत्वाचे प्रतिपादन करतो

1 मग ईयोबाने प्रत्युत्तर केले,

2 “तू निर्बळास केवढेसे साहाय्य केले? शक्तिहीन बाहूला तू कितीसा आधार दिलास?

3 बुद्धिहीनास कशी काय मसलत दिली? तू कितीसे मोठे ज्ञान प्रकट केलेस?

4 तू कोणापुढे हे शब्द बोललास? कोणाचे मनोगत तुझ्या तोंडून निघाले?

5 मृतांचे आत्मे जलनिधीच्या व जलचरांच्या खाली थरथरा कापत आहेत.

6 देवापुढे अधोलोक उघडा आहे; विनाशस्थान1 आच्छादित नाही.

7 त्याने उत्तरेकडील नभोमंडळ शून्य अवकाशावर पसरले आहे; त्याने पृथ्वी निराधार टांगली आहे.

8 तो पाणी मेघमंडळात कोंडून ठेवतो; मेघ त्याच्या भाराने भंग पावत नाहीत.

9 तो आपल्या सिंहासनापुढे आपले मेघ पसरून ते झाकून टाकतो;

10 प्रकाश व अंधकार ह्यांमधील हद्दीशी त्याने जलनिधीची सीमा भिडवली आहे.

11 त्याच्या धाकाने गगनस्तंभ थरथर कापतात व भयचकित होतात.

12 तो आपल्या सामर्थ्याने समुद्र शमवतो;2 तो आपल्या बुद्धिबलाने राहाब छिन्नभिन्न करतो;

13 त्याच्या नि:श्वासाने आकाशाची शोभा प्रकट होते; त्याच्या हाताने धावता राक्षसी सर्प विंधला आहे;

14 पाहा, ह्या त्याच्या कार्यक्षेत्राच्या केवळ सीमा आहेत; त्याची केवळ चाहूल आपल्या कानी येते; पण त्याच्या प्रभावाच्या गर्जनेचा अंत कोणाला लागेल?”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan