Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

इय्योब 25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


देवापुढे मानव न्यायी ठरत नाही असे बिल्ददचे म्हणणे

1 मग बिल्दद शूही म्हणाला,

2 “प्रभुत्व चालवणे व भीती दाखवणे हे देवाकडेच आहे; तो उर्ध्वलोकी शांती राखतो.

3 त्याच्या सैन्यांची गणती करता येईल काय? त्याचा प्रकाश कोणावर पडत नाही?

4 मर्त्य मानव देवापुढे नीतिमान कसा ठरेल? स्त्रीपासून जन्मलेला पुरुष निर्मळ कसा ठरेल?

5 पाहा, त्याच्या दृष्टीने चंद्रही निस्तेज आहे, आणि तारेही निर्मळ नाहीत.

6 तर मर्त्य मानव, जो केवळ कीटक, मानवपुत्र जो केवळ कृमी, त्याची काय कथा!”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan