Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

इय्योब 17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 “माझा प्राणनाश होत आहे. माझे दिवस संपले आहेत; मला कबर काय ती राहिली आहे.

2 लोकांच्या विटंबनेने मला घेरले आहे; त्यांचे खिजवणे माझ्या नेत्रांसमोर सतत चालू आहे.

3 आता हडप दे, तुझ्यामाझ्यामध्ये तूच माझा जामीन हो; माझ्या हातावर हात मारील असा दुसरा कोण आहे?

4 तू त्यांच्या मनात अकलेचा प्रवेश होऊ दिला नाहीस; म्हणून तू त्यांचे वर्चस्व होऊ देणार नाहीस.

5 जो आपल्या मित्रांशी दगा करून त्यांना लुटीप्रमाणे परक्यांच्या हाती देतो, त्याच्या मुलाबाळांचे डोळे जातील.

6 त्याने माझे नाव लोकात निंदाव्यंजक केले आहे; लोक माझ्या तोंडावर थुंकत आहेत.

7 माझे डोळे दुःखाने अंधुक झाले आहेत; माझे सर्व अवयव छायारूप झाले आहेत.

8 हे पाहून सरळ मनाचे लोक चकित होतील; निर्दोष जन भक्तिहीनामुळे क्रुद्ध होतील;

9 तरी नीतिमान आपला मार्ग धरून राहील, निर्मळ हाताच्या मनुष्याला अधिकाधिक शक्ती प्राप्त होईल;

10 पण तुम्ही सर्व पुन्हा वादास या; तुमच्यामध्ये मला एकही सुज्ञ आढळायचा नाही.

11 माझे दिवस आटोपले आहेत; माझे मनोरथ, माझ्या मनातले विचार, निष्फळ झाले आहेत.

12 ते रात्रीला दिवस ठरवतात; ‘अंधकारापेक्षा प्रकाश जवळ आहे’ असे ते म्हणतात.

13 जर अधोलोक माझे निजधाम आहे, एवढीच मला आशा आहे. जर मी आपली शय्या अंधकारात केली आहे,

14 जर मी गर्तेस म्हणालो, ‘तू माझा बाप;’ किडीला म्हणालो आहे ‘तू माझी आईबहीण;’

15 तर आता मला आशा राहिली आहे कोठे? माझ्या आशेविषयी म्हणाल तर ती कोणाला दिसेल?

16 ती अधोलोकाच्या अडसरांपर्यंत उतरेल, तेव्हा मातीत एकदाचा आम्हांला विराम मिळेल.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan