यिर्मया 45 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)बारुखाला यिर्मयाचा संदेश 1 यहूदाचा राजा योशीयाचा पुत्र यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी बारूख बिन नेरीया ह्याने यिर्मयाच्या तोंडची ही वचने पुस्तकात लिहिली तेव्हा त्याला यिर्मया संदेष्टा हे वचन बोलला : 2 “हे बारुखा, परमेश्वर, इस्राएलाचा देव तुला असे म्हणतो : 3 तू म्हणालास, ‘हायहाय! परमेश्वराने माझ्या क्लेशात दुःखाची भर घातली आहे. मी कण्हून कण्हून थकलो आहे, मला काही चैन पडत नाही.’ 4 ह्यास्तव त्याला सांग, परमेश्वर म्हणतो, पाहा, मी जे उभारले ते मोडून टाकीन, मी जे लावले ते उपटून टाकीन; सर्व पृथ्वीची हीच वाट. 5 तू आपणासाठी मोठाल्या गोष्टींची वांच्छा करतोस काय? ती करू नकोस, पाहा, मी सर्व मानवांवर अरिष्ट आणीन, असे परमेश्वर म्हणतो; पण जेथे जेथे तू जाशील तेथे तेथे तू जिवानिशी सुटशील.” |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India