Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यशायाह 4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 त्या दिवशी सात स्त्रिया एका पुरुषाला धरून म्हणतील, “आम्ही स्वतःचे अन्न खाऊ व स्वत:चे वस्त्र लेऊ; तुझे नाव मात्र आम्हांला लावू दे; आमची अपकीर्ती दूर कर.”


यरुशलेमेचे उज्ज्वल भवितव्य

2 त्या दिवशी परमेश्वराचा अंकुर शोभिवंत व तेजस्वी होईल; भूमीचे उत्पन्न इस्राएलाच्या बचावलेल्यांना वैभव व शोभा देणारे होईल.

3 मग असे होईल की सीयोनेत उरलेल्या, यरुशलेमेत शेष राहिलेल्या ज्या प्रत्येकाचे नाव यरुशलेमेतील जीवन पावणार्‍यांच्या यादीत लिहिले आहे त्या प्रत्येकाला पवित्र म्हणतील.

4 प्रभू न्याय करणार्‍या व दहन करणार्‍या आत्म्याच्या द्वारे सीयोनेच्या कन्यांचा मळ काढून टाकील, आणि यरुशलेमेतून तिचा रक्तदोष काढून टाकील, तेव्हा असे घडेल.

5 आणि परमेश्वर सीयोन डोंगराच्या प्रत्येक स्थानावर व त्याच्या सणामेळ्यांवर दिवसा धूम्रमय मेघ व रात्री प्रज्वलित अग्नीचा प्रकाश निर्माण करील; कारण त्याच्या सर्व वैभवावर छत्र होईल.

6 आणि दिवसा ऊन लागू नये, सावली व्हावी; आणि वादळ व पाऊस ह्यांपासून रक्षण होण्यासाठी निवारा व आश्रय असावा म्हणून मंडप घालण्यात येईल.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan