Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

होशेय 4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 नंतर इस्राएल लोक परततील आणि आपला देव परमेश्वर व आपला राजा दावीद ह्यांना शरण येतील; ते शेवटच्या दिवसांत भीतीने कंपित होऊन परमेश्वराचा व त्याच्या चांगुलपणाचा आश्रय करतील.” इस्राएलाशी परमेश्वराचा वाद 4 इस्राएल लोकहो, परमेश्वराचे वचन ऐका, कारण देशातून सत्य, दया, व देवज्ञान ही नाहीतशी झाल्यामुळे परमेश्वर ह्या देशाच्या रहिवाशांबरोबर वाद करीत आहे.

2 शपथ वाहून ती मोडणे, मनुष्यवध करणे, चोरी करणे, व्यभिचार करणे ह्यांना ऊत आला आहे; रक्तपातामागून रक्तपात होत आहेत.

3 ह्यामुळे देश शोक करीत आहे व त्यातील सर्व रहिवासी व त्यांच्याबरोबर वनपशू व आकाशातील पक्षी म्लान झाले आहेत; समुद्रातले मासेही नाहीतसे झाले आहेत.

4 तरी कोणी विवाद करू नये, कोणी कोणाचा दोष काढू नये, कारण तुझे लोक याजकाबरोबर वाद घालणार्‍यांसारखे आहेत.

5 तू दिवसा ठेच खाशील, रात्री तुझ्यासह संदेष्टाही ठेच खाईल आणि मी तुझ्या आईचा नाश करीन.

6 ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. तू ज्ञानाचा अव्हेर केलास म्हणून मीही तुझा अव्हेर करीन; म्हणजे अर्थात मी याजकाचे काम तुला करू देणार नाही; तू आपल्या देवाचे नियमशास्त्र विसरलास म्हणून मीही तुझ्या मुलांना विसरेन.

7 जसजशी ह्यांची संख्या वाढत गेली तसतसे ते माझ्याविरुद्ध पाप करीत गेले; मी त्यांचे वैभव पालटून त्याची अप्रतिष्ठा करीन.2

8 ते माझ्या लोकांच्या पापावर पोसत आहेत, त्यांच्या अधर्माकडे त्यांचे चित्त लागले आहे.

9 जसा याजक तसे लोक असे होईल; त्यांच्या आचरणाबद्दल मी त्यांना शासन करीन, त्यांच्या कर्माचे प्रतिफळ त्यांना देईन.

10 ते खातील पण त्यांची तृप्ती व्हायची नाही; ते व्यभिचार करतील व त्यांची वाढ होणार नाही, कारण त्यांनी परमेश्वराकडे चित्त लावण्याचे सोडून दिले आहे.

11 जारकर्म, द्राक्षारस व नवा द्राक्षारस विवेक नष्ट करतात.

12 माझे लोक आपल्या लाकडाच्या ठोकळ्याला प्रश्‍न विचारतात; त्यांची काठी त्यांना शकुन सांगते; कारण अनाचारबुद्धीने त्यांना बहकवले आहे, परमेश्वराचा त्याग करणे हा अनाचार त्यांनी केला आहे.

13 ते पर्वतांच्या माथ्यांवर यज्ञयाग करतात व टेकड्यांवर ओक, हिवर व एला ह्या झाडांची छाया चांगली असल्यामुळे त्यांच्याखाली धूप जाळतात; म्हणून तुमच्या कन्या व्यभिचार करतात व तुमच्या सुना जारकर्म करतात.

14 तुमच्या कन्या व्यभिचार करतात व तुमच्या सुना जारकर्म करतात त्याबद्दल त्यांना मी शासन करणार नाही; कारण ते स्वतः वेश्यांकडे जातात व कसबिणींसह यज्ञ करतात; ह्यास्तव हे ज्ञानशून्य लोक नाश पावत आहेत.

15 हे इस्राएला, तू जरी जारकर्म केले आहेस तरी यहूदाने अशा पापात पडू नये; गिल्गालास येऊ नका, व बेथ-आवेनास जाऊ नका, परमेश्वराच्या जीविताची शपथ वाहू नका.”

16 कारण इस्राएल हट्टी कालवडीसारखा हट्ट करीत आहे; आता परमेश्वर विस्तीर्ण कुरणात कोकराप्रमाणे त्यांना चारील.

17 एफ्राईम मूर्तीवर आसक्त झाला आहे, त्याचे नाव सोडून द्या.

18 त्यांचा पानोत्सव आटोपल्यावर ते व्यभिचारात मग्न होतात; त्यांच्या सरदारांना3 अप्रतिष्ठा अति प्रिय आहे.

19 वार्‍याने त्यांना आपल्या पंखांत लपेटून टाकले आहे; ते आपल्या यज्ञयागास्तव लज्जित होतील.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan