Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

होशेय 3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


होशेय व जारिणी

1 मग परमेश्वराने मला म्हटले, “इस्राएल लोक अन्य देवांकडे वळतात व मनुकांच्या ढेपांची आवड धरतात, तरी त्यांच्यावर परमेश्वर प्रेम करतो. त्याप्रमाणे तू पुन्हा जाऊन जी स्त्री जारिणी असून आपल्या सख्याला प्रिय आहे तिच्यावर प्रेम कर.”

2 मग मी पंधरा रुपये व दीड मण जव देऊन तिला आपल्यासाठी विकत घेतले.

3 मी तिला म्हणालो, “तू पुष्कळ दिवस माझ्याकरता स्वस्थ बसून राहा, जारकर्म करू नकोस, परपुरुषाची होऊ नकोस; मीही तुझ्याशी असाच वागेन.”

4 कारण पुष्कळ दिवसपर्यंत इस्राएल लोक हे राजा, सरदार, यज्ञ, पूजास्तंभ, एफोद व तेराफीम1 ह्यांवाचून बसून राहतील.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan