एज्रा 2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)परत आलेल्या लोकांची यादी ( नहे. 7:5-73 ) 1 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने जे लोक पाडाव करून बाबेलास नेले होते त्यांतले त्या मुलखात राहणारे बंधमुक्त होऊन यरुशलेमास व यहूदातील आपापल्या नगरी परत गेले ते हे : 2 जरूब्बाबेलबरोबर आले ते येशूवा, नहेम्या, सराया, रएलाया, मर्दखय, बिलशान, मिस्पार, बिग्वई, रहूम, बाना. इस्राएल लोकांतल्या मनुष्यांची ही मोजदाद आहे : 3 पारोशाचे वंशज दोन हजार एकशे बाहत्तर, 4 शफाट्याचे वंशज तीनशे बाहत्तर, 5 आरहाचे वंशज सातशे पंचाहत्तर, 6 पहथ-मवाबाचे वंशज, येशूवा व यवाब ह्यांच्या कुळातले दोन हजार आठशे बारा, 7 एलामाचे वंशज एक हजार दोनशे चौपन्न, 8 जत्तूचे वंशज नऊशे पंचेचाळीस, 9 जक्काईचे वंशज सातशे साठ, 10 बानीचे वंशज सहाशे बेचाळीस, 11 बेबाईचे वंशज सहाशे तेवीस, 12 अजगादाचे वंशज एक हजार दोनशे बावीस, 13 अदोनीकामाचे वंशज सहाशे सहासष्ट, 14 बिग्वईचे वंशज दोन हजार छप्पन्न, 15 आदीनाचे वंशज चारशे चौपन्न, 16 हिज्कीयाच्या वंशातला आटेर ह्याच्या कुळातले अठ्ठ्याण्णव, 17 बेसाईचे वंशज तीनशे तेवीस, 18 योराचे लोक एकशे बारा, 19 हाशूमाचे लोक दोनशे तेवीस, 20 गिबाराचे लोक पंचाण्णव, 21 बेथलेहेमाचे लोक एकशे तेवीस, 22 नटोफाचे लोक छप्पन्न, 23 अनाथोथचे लोक एकशे अठ्ठावीस, 24 अजमावेथाचे लोक बेचाळीस, 25 किर्याथ-यारीम, कफीरा व बैरोथ ह्यांतले लोक सातशे त्रेचाळीस, 26 रामा व गेबा ह्यांतले लोक सहाशे एकवीस, 27 मिखमासाचे लोक एकशे बावीस, 28 बेथेल व आय ह्यांतले लोक दोनशे तेवीस, 29 नबोचे लोक बावन्न, 30 मग्वीशचे वंशज एकशे छप्पन्न, 31 दुसर्या एलामाचे वंशज एक हजार दोनशे चोपन्न, 32 हारीमाचे वंशज तीनशे वीस, 33 लोद-हादीद व ओनो ह्यांतले लोक सातशे पंचवीस, 34 यरीहोचे लोक तीनशे पंचेचाळीस, 35 सनाहचे लोक तीन हजार सहाशे तीस, 36 याजकांपैकी : येशूवाच्या घराण्यातले यदायाचे वंशज नऊशे बाहत्तर, 37 इम्मेराचे वंशज एक हजार बावन्न, 38 पशहूराचे वंशज एक हजार दोनशे सत्तेचाळीस, 39 हारीमाचे वंशज एक हजार सतरा, 40 लेव्यांपैकी : होदव्याच्या वंशापैकी येशूवा व कदमीएल ह्यांच्या वंशातले चौर्याहत्तर, 41 गायकांपैकी आसाफाच्या वंशातले एकशे अठ्ठावीस, 42 द्वारपालांपैकी : शल्लूमाचे वंशज, आहेराचे वंशज, तल्मोनाचे वंशज, अक्कूबाचे वंशज, हतीताचे वंशज, व शोबाईचे वंशज हे सर्व मिळून एकशे एकोणचाळीस, 43 नथीनीमांपैकी : सीहाचे वंशज, हसूफाचे वंशज, तब्बावोथाचे वंशज, 44 केरोसाचे वंशज, सीहाचे वंशज, पादोनाचे वंशज, 45 लबानाचे वंशज, हगबाचे वंशज, अकूबाचे वंशज, 46 हागाबाचे वंशज, शम्लाईचे वंशज, हानानाचे वंशज, 47 गिद्देलाचे वंशज, गहराचे वंशज, रायाचे वंशज, 48 रसीनाचे वंशज, नकोदाचे वंशज, गज्जामाचे वंशज, 49 उज्जाचे वंशज, पासेहाचे वंशज, बेसाईचे वंशज, 50 अस्नाचे वंशज, मऊनीमाचे वंशज, नफ्सीमाचे वंशज, 51 बकबुकाचे वंशज, हकूफाचे वंशज, हर्हूराचे वंशज, 52 बस्लूथाचे वंशज, महिदाचे वंशज, हर्षाचे वंशज, 53 बर्कोसाचे वंशज, सीसराचे वंशज, तामहाचे वंशज, 54 नसीहाचे वंशज, हतिफाचे वंशज, 55 शलमोनाच्या चाकरांचे वंशज, सोताईचे वंशज, हसोफरताचे वंशज, परूदाचे वंशज, 56 जालाचे वंशज, दर्कोनाचे वंशज, गिद्देलाचे वंशज, 57 शफाट्याचे वंशज, हत्तीलाचे वंशज, पोखेरेथ-हस्सबाईमाचे वंशज, आमीचे वंशज, 58 सर्व नथीनीम व शलमोनाच्या चाकरांचे वंशज हे सगळे मिळून तीनशे ब्याण्णव होते. 59 तेल्मेलह, तेल्हर्षा, करूब, अद्दान व इम्मेर येथून जे वर आले ते हेच होते, परंतु ते इस्राएलातले होते किंवा नाही ह्याविषयी आपापली पितृकुळे व आपापली वंशावळी त्यांना दाखवता आली नाही. 60 दलायाचे वंशज, तोबियाचे वंशज, नकोदाचे वंशज सहाशे बावन्न; 61 आणि याजकांच्या कुळांपैकी : हबयाचे वंशज, हक्कोसाचे वंशज, बर्जिल्लयाचे वंशज, त्याने बर्जिल्लय गिलादाच्या एका कन्येशी विवाह केला, त्यावरून त्याला त्यांचे नाव पडले. 62 ह्या सर्वांनी आपापल्या वंशावळींचा लेख ज्यांची वंशावळी नोंदली होती त्यांच्या वहीत शोधला पण त्यांना तो न मिळाल्यामुळे ते अशुद्ध ठरून याजकपदावरून भ्रष्ट झाले. 63 तिर्शाथा1 त्यांना म्हणाला, “उरीम व थुम्मीम धारण करणार्या याजकाची स्थापना होईपर्यंत तुम्ही कोणी परमपवित्र पदार्थ खाण्यास पात्र नाही.” 64 ही सारी मंडळी मिळून एकंदर बेचाळीस हजार तीनशे साठ होती; 65 ह्याशिवाय त्यांचे सात हजार तीनशे सदतीस दास व दासी आणि दोनशे गाणारे व गाणार्या होत्या. 66 त्यांची घोडी सातशे छत्तीस, त्यांची खेचरे दोनशे पंचेचाळीस, 67 त्यांचे उंट चारशे पस्तीस व त्यांची गाढवे सहा हजार सातशे वीस होती. 68 पितृकुळातील कित्येक प्रमुख पुरुष यरुशलेमेतील परमेश्वराच्या मंदिराकडे आले तेव्हा देवाचे मंदिर पूर्ववत उभे करण्यासाठी त्यांनी स्वखुशीने अर्पणे दिली; 69 त्यांनी आपल्या शक्तीनुसार एकसष्ट हजार दारिक1 सोने पाच हजार माने1 चांदी आणि शंभर याजकीय वस्त्रे भांडारात पावती केली. 70 ह्या प्रकारे याजक, लेवी, कित्येक सामान्य लोक, गायक, द्वारपाळ आणि नथीनीम हे आपापल्या नगरात राहिले; असे सर्व इस्राएल आपापल्या नगरात पुन्हा वस्ती करून राहिले. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India