एस्तेर 10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)मर्दखयाची महती 1 अहश्वेरोश राजाने देशावर व समुद्रालगतच्या बेटांवर खंडणी बसवली. 2 त्याच्या सामर्थ्याच्या व पराक्रमाच्या कृत्यांची आणि मर्दखयास राजाने महतीस चढवल्याची साद्यंत हकिकत मेदी व पारसी ह्यांच्या इतिहासाच्या ग्रंथात लिहिली आहे, नाही काय? 3 मर्दखय यहूदी ह्याचा दर्जा अहश्वेरोश राजाच्या खालोखाल होता; यहूदी लोकांमध्ये तो फार थोर होता; त्याच्या बांधवसमुदायात त्याची मोठी मान्यता असे; तो आपल्या लोकांचे कल्याण करण्यास झटे व आपल्या सर्व लोकांचे कुशल कसे होईल ह्याकडे त्याचे लक्ष असे. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India