Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

१ करिंथ 16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


यरुशलेमेतील गोरगरिबांसाठी वर्गणी

1 आता पवित्र जनांसाठी जी वर्गणी गोळा करायची तिच्याविषयी मी गलतीयातील मंडळ्यांना आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्हीही करा.

2 आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने जसे आपणाला यश मिळाले असेल3 त्या मानाने आपणाजवळ द्रव्य जमा करून ठेवावे; अशा हेतूने की, मी येईन तेव्हा वर्गण्या होऊ नयेत.

3 मी येईन तेव्हा ज्या कोणास तुम्ही पत्रे देऊन मान्यता द्याल त्यांना तुमचा धर्मादाय यरुशलेमेस पोहचवण्याकरता मी पाठवीन.

4 मीही जावे असे योग्य दिसल्यास ते माझ्याबरोबर येतील.


खाजगी बाबी व निरोप

5 मी मासेदोनियातून जाईन तेव्हा तुमच्याकडे येईन; कारण मी मासेदोनियातून जाणार आहे;

6 पण कदाचित तुमच्याजवळ राहीन व हिवाळाही घालवीन; अशा हेतूने की, मला जायचे असेल तिकडे तुम्ही मला वाटेस लावावे.

7 कारण आता तुम्हांला केवळ भेटून जावे अशी माझी इच्छा नाही; तर प्रभूची इच्छा असल्यास मी काही वेळ तुमच्याजवळ राहीन अशी आशा मी बाळगून आहे.

8 तरी पन्नासाव्या दिवसाच्या सणापर्यंत मी इफिस येथे राहीन;

9 कारण मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार माझ्यासाठी उघडले आहे; आणि विरोध करणारे पुष्कळच आहेत.

10 तीमथ्य आल्यास त्याने तुमच्याजवळ निर्भयपणाने राहावे म्हणून खबरदारी घ्या; कारण माझ्याप्रमाणे तोही प्रभूचे कार्य करत आहे.

11 म्हणून कोणी त्याला तुच्छ मानू नये; तर त्याने माझ्याकडे यावे म्हणून त्याला सुखरूपपणे वाटेस लावा; कारण बंधुजनांसह त्याच्या येण्याची मी वाट पाहत आहे.

12 आपला बंधू अपुल्लोस ह्याने बंधुजनांबरोबर तुमच्याकडे यावे, म्हणून मी त्याची फार विनवणी केली; तथापि आताचयावे अशी त्याची इच्छा अगदी नव्हती; सवड होईल तेव्हा तो येईल.

13 सावध असा, विश्वासात स्थिर राहा, मर्दासारखे वागा; खंबीर व्हा.

14 तुम्ही जे काही करता ते सर्व प्रीतीने करा.

15 बंधुजनहो, तुम्हांला स्तेफनाच्या घराण्याची माहिती आहे; ते अखयाचे प्रथमफळ आहे, आणि त्यांनी आपणांस पवित्र जनांच्या सेवेला वाहून घेतले आहे.

16 अशांना, आणि जो कोणी सेवेत साहाय्य करतो व श्रम करतो त्याला, तुम्ही मान्यता द्यावी अशी मी तुम्हांला विनंती करतो.

17 स्तेफना, फर्तूनात व अखायिक हे आल्याने मला आनंद झाला आहे; कारण तुम्ही नसल्याची उणीव त्यांनी भरून काढली आहे.

18 कारण त्यांनी माझ्या व तुमच्या आत्म्यांना हुरूप आणला आहे; म्हणून तुम्ही अशांना मान द्या.

19 आशियातल्या मंडळ्या तुम्हांला सलाम सांगतात. अक्‍विला, प्रिस्का, व त्यांच्या घरात जी मंडळी जमत असते, ती तुम्हांला प्रभूमध्ये फार फार सलाम सांगतात.

20 सर्व बंधू तुम्हांला सलाम सांगतात. पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करा.

21 माझा पौलाचा स्वदस्तुरचा सलाम.

22 जर कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर प्रीती करत नसेल, तर तो शापभ्रष्ट असो. माराना था.1

23 प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्यासह असो.

24 ख्रिस्त येशूमध्ये माझी प्रीती तुम्हा सर्वांसह असो. आमेन.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan