Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

१ इतिहास 8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


बन्यामिनाचे वंशज

1 बन्यामिनाला ज्येष्ठ पुत्र बेला, दुसरा आश्बेल, तिसरा अहरह,

2 चौथा नोहाह व पाचवा राफा हे झाले.

3 बेलाचे पुत्र : अद्दार, गेरा, अबीहूद,

4 अबीशूवा, नामान, अहोह,

5 गेरा, शफूफान व हूराम.

6 एहूदाचे पुत्र गेबा येथल्या पितृकुळांचे प्रमुख होते; त्यांना पाडाव करून मानाहथ येथे नेले;

7 नामान, अहीया व गेरा ह्यांना त्याने कैद करून नेले; त्याला उज्जा व अहीहूद हे झाले.

8 त्यांना घालवून दिल्यावर मवाबाच्या पठारात शहरयिमास संतती झाली; त्याच्या बायका हुशीम व बारा ह्या होत्या.

9 त्याची बायको होदेश; हिच्या पोटी त्याला योबाब, सिब्या, मेशा, मल्काम,

10 यऊस, शख्या व मिर्मा हे झाले. हे त्याचे पुत्र त्यांच्या पितृकुळांतले प्रमुख होत.

11 हुशीमेपासून त्याला अबीटूब व एल्पाल झाले.

12 एल्पालाचे पुत्र : एबर, मिशाम व शमेद; शमेदाने ओनो व लोद आणि त्यांची खेडीपाडी वसवली.

13 बरीया व शमा हे अयालोनकरांच्या पितृकुळातील प्रमुख पुरुष होते व त्यांनी गथकरांना पळवून लावले;

14 अह्यो, शाशक, यरेमोथ,

15 जबद्या, अराद, एदर,

16 मीखाएल, इश्पा व योहा, हे बरीयाचे पुत्र;

17 जबद्या, मशुल्लाम, हिज्की, हेबेर;

18 इश्मरय, इज्लीया व योबाब हे एल्पालाचे पुत्र;

19 याकीम, जिख्री, जब्दी,

20 एलीएनय, सिलथय, अलीएल,

21 अदाया, बराया व शिम्राथ हे शिमीचे पुत्र;

22 इश्पान, एबर, अलीएल;

23 अब्दोन, जिख्री, हानान,

24 हनन्या, एलाम, अनथोथीया,

25 इफदया व पनुएल हे शाशकाचे पुत्र;

26 शम्शरय, शहर्‍या, अथल्या,

27 यारेश्या, एलीया व जिख्री हे यरोहामाचे पुत्र;

28 हे आपापल्या पिढीत आपापल्या पितृकुळांतले प्रमुख पुरुष असून यरुशलेम येथे राहत असत.


शौलाची वंशावळ
( १ इति. 9:35-44 )

29 गिबोनात गिबोनाचा बाप राहत होता, त्याच्या बायकोचे नाव माका;

30 त्याचे पुत्र : ज्येष्ठ अब्दोन, सूर, कीश, बाल, नादाब,

31 गदोर, अह्यो व जेखर,

32 आणि मिकलोथास शिमा झाला. हे आपल्या भाऊबंदांसमोर त्यांच्याबरोबर यरुशलेम येथे वस्ती करून होते.

33 नेराला कीश झाला; कीशास शौल झाला. शौलास योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब व एश्बाल हे होते.

34 योनाथानाचा पुत्र मरीब्बाल; मरीब्बाल ह्याला मीखा झाला.

35 मीखाचे पुत्र : पीथोन, मेलेख, तरेया व आहाज.

36 आहाजास यहोअद्दा झाला; यहोआद्दास आलेमेथ, अजवामेथ व जिम्री हे झाले; जिम्रीस मोसा झाला.

37 मोसाला बिना झाला; त्याचा पुत्र राफा, त्याचा पुत्र एलासा व त्याचा पुत्र आसेल;

38 आसेलास सहा पुत्र होते, त्यांची नावे ही : अज्रीकाम, बोखरू, इश्माएल, शार्‍या, ओबद्या व हान; हे सर्व आसेलाचे पुत्र.

39 त्याचा भाऊ एशेक ह्याचे पुत्र : ज्येष्ठ ऊलाम, दुसरा यऊष व तिसरा अलीफलेत.

40 ऊलामाचे वंशज शूर वीर असून धनुर्धारी होते; त्यांचे पुत्रपौत्र मिळून दीडशे होते. हे सर्व बन्यामिनाच्या वंशातले होते.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan