१ इतिहास 7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)इस्साखाराचे वंशज 1 इस्साखाराचे पुत्र तोला, पुवा, याशूब व शिम्रोन असे चार. 2 तोलाचे पुत्र : उज्जी, रकाया, यरीएल, यहमय, इबसाम व शमुवेल; हे आपला बाप तोला ह्याच्या घराण्याचे प्रमुख असून आपल्या पिढीतले शूर वीर पुरुष होते; त्यांची संख्या दाविदाच्या काळात बावीस हजार सहाशे होती. 3 उज्जीचा पुत्र इज्रह्या; इज्रह्याचे पुत्र मीखाएल, ओबद्या, योएल व इश्शीया असे पाच होते; हे सर्व प्रमुख पुरुष होते. 4 त्यांच्या कुळांप्रमाणे व पितृकुळांप्रमाणे लढाईच्या सैन्याच्या टोळ्यांत त्यांचे छत्तीस हजार पुरुष असत; कारण त्यांना बायका व मुले पुष्कळ होती. 5 इस्साखाराच्या सर्व कुळांतले त्यांचे भाऊबंद शूर पुरुष होते; वंशावळीत ते एकंदर सत्त्याऐंशी हजार नमूद झाले होते. बन्यामिनाचे वंशज 6 बन्यामिनाचे पुत्र : बेला व बेकेर व यदीएल असे तिघे. 7 बेलाचे पुत्र : एस्बोन, उज्जी, उज्जीएल, यरीमोथ व ईरी असे पाच; हे आपल्या पितृकुळाचे प्रमुख असून शूर वीर होते; वंशावळीत ते बावीस हजार चौतीस नमूद झाले होते. 8 बेकेराचे पुत्र : जमीरा, योवाश, अलियेजर, एल्योवेनय, अम्री, यरेमोथ, अबीया, अनाथोथ व अलेमेथ. हे सर्व बेकेराचे पुत्र. 9 ते आपापल्या पितृकुळांचे प्रमुख असून शूर वीर होते. वंशावळीत ते वीस हजार दोनशे नमूद झाले होते. 10 यदीएलाचा पुत्र बिल्हान; बिल्हानाचे पुत्र यऊश, बन्यामीन, एहूद, कनाना, जेथान, तार्शीश व अहीशाहर. 11 हे सर्व यदीएलाचे वंशज; ते आपल्या पितृकुळांचे प्रमुख असून शूर वीर होते; सेनेबरोबर जाण्यास लायक असे ते सतरा हजार दोनशे होते. 12 ईराचे वंशज : शुप्पीम व हुप्पीम; आणि अहेराचे वंशज हुशीम. नफतालीचे वंशज 13 नफतालीचे पुत्र यहसिएल, गूनी, येसेर व शल्लूम, ही बिल्हेची संतती. मनश्शेचे वंशज 14 मनश्शेचे पुत्र : त्याच्या बायकोपासून त्याला अस्रीएल झाला; त्याच्या अरामी उपपत्नीपासून त्याला गिलादाचा बाप माखीर हा झाला. 15 माखीराने हुप्पीम व शुप्पीम ह्यांची बहीण बायको केली; तिचे नाव माका; दुसर्या पुत्राचे नाव सलाफहाद; सलाफहादाला मुलीच होत्या. 16 माखीराची बायको माका हिला पुत्र झाला. त्याचे नाव तिने पेरेस ठेवले व त्याच्या भावाचे नाव शेरेश होते. त्याचे पुत्र ऊलाम व रेकेम. 17 ऊलामाचा पुत्र बदान. गिलाद बिन माखीर बिन मनश्शे ह्याचे पुत्र हे : 18 त्याची बहीण हम्मोलेखेथ हिला इशहोद, अबीयेजेर व महला ही झाली. 19 शमीदाचे पुत्र : अह्यान, शेखेम, लिखी व अनीयाम. एफ्राइमाचे वंशज 20 एफ्राइमाचे पुत्र : त्याचा पुत्र शुथेलाह, त्याचा पुत्र बेरेद, त्याचा पुत्र तहथ, त्याचा पुत्र एलादा; त्याचा पुत्र तहथ, 21 त्याचा पुत्र जाबाद, त्याचा पुत्र शुथेलाह आणि एजेर व एलद; ह्यांना गथच्या मूळच्या रहिवाशांनी मारून टाकले, कारण त्यांची गुरेढोरे हरण करण्यासाठी ते गेले होते. 22 ह्यामुळे त्यांचा बाप एफ्राईम ह्याने बहुत दिवस शोक केला, आणि त्याचे भाऊबंद त्याचे सांत्वन करण्यासाठी आले. 23 तो आपल्या बायकोपाशी गेला आणि ती गर्भवती होऊन तिला एक पुत्र झाला; त्याने त्याचे नाव बरीया (भाग्यहीन) असे ठेवले, कारण त्याच्या घराण्यावर दुर्दैव ओढवले होते. 24 त्याची कन्या शेरा; तिने खालचे व वरचे बेथ-होरोन व उज्जेन-शेरा ही वसवली. 25 त्याचे पुत्र रेफह व रेशेफ; रेशेफाचा पुत्र तेलह, त्याचा पुत्र तहन, 26 त्याचा पुत्र लादान, त्याचा पुत्र अम्मीहूद, त्याचा पुत्र अलीशामा, 27 त्याचा पुत्र नून व त्याचा पुत्र यहोशवा. 28 त्यांची वतने व वसतिस्थाने ही होत : बेथेल व त्याच्यालगतची खेडी. पूर्वेस नारान, पश्चिमेस गेजेर व त्याची खेडी, शखेम व त्याची खेडी, गज्जा व त्याची खेडी येथपर्यंत; 29 त्याप्रमाणेच मनश्शेच्या वंशजांच्या सीमेवरील बेथ-शान व त्याची खेडी, तानख व त्याची खेडी, मगिद्दो व त्याची खेडी, दोर व त्याची खेडी. ह्यांत इस्राएलाचा पुत्र योसेफ ह्याचे वंशज राहत होते. आशेराचे वंशज 30 आशेराजे पुत्र : इम्ना, इश्वा, इश्वी, बरीया व त्यांची बहीण सेराह. 31 बरीयाचे पुत्र : हेबेर व मालकीएल, हा बिर्जाविथाचा बाप. 32 हेबेरास यफलेट, शोमेर, होथाम व त्यांची बहीण शूवा ही झाली. 33 यफलेटाचे पुत्र : पासख, बिम्हाल व अश्वाथ; ही यफलेटाची संतती. 34 शेमेराचे पुत्र : अही, राहागा, यहूबा व अराम. 35 त्याचा भाऊ हेलेम ह्याचे पुत्र सोफह, इम्ना, शेलेश व आमाल. 36 सोफहाचे पुत्र : सूहा, हर्नेफेर, शूवाल, बेरी, इम्रा, 37 बेसेर, होद, शम्मा, शिलशा, इथ्रान व बैरा. 38 येथेराचे पुत्र : यफुन्ने, पिस्पा व अरा. 39 उल्लाचे पुत्र : आरह, हन्निएल व रिस्या. 40 हे सर्व आशेराचे वंशज होते; हे आपल्या पितृकुळांचे प्रमुख असून निवडक महावीरांचे व सरदारांचे अग्रणी होते; आणि लढाईच्या कामगिरीसाठी त्यांची टीप घेतली तेव्हा ते सव्वीस हजार भरले. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India