१ इतिहास 4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)यहूदाचे वंशज 1 यहूदाचे पुत्र : पेरेस, हेस्रोन, कर्मी, हूर व शोबाल. 2 राया बिन शोबाल ह्याला यहथ झाला; यहथाला अहूमय व लहद हे झाले. ही सराथी कुळे होत. 3 एटामाच्या बापाचे पुत्र हे : इज्रेल, हश्मा व इद्बाश; त्यांच्या बहिणीचे नाव हस्सलेलपोनी असे होते; 4 आणि गदोराचा बाप पनुएल व हूशाचा बाप एजेर. बेथलेहेमाच्या बापास एफ्राथेपासून झालेला ज्येष्ठ पुत्र हूर ह्याची ही संतती. 5 तकोवाचा बाप अश्हूर ह्याला हेला व नारा अशा दोन बायका होत्या. 6 नारेच्या पोटी त्याला अहुज्जाम, हेफेर, तेमनी व अहष्टारी झाले. ही नारेची संतती. 7 हेलेचे पुत्र : सेरथ, इसहार व एथ्नान. 8 कोसाला आनूब व सोबेबा हे झाले, तसेच त्याच्यापासून हारुमाचा पुत्र अहरहेल ह्याची कुळे निपजली. 9 याबेस हा आपल्या भाऊबंदांमध्ये फार प्रतिष्ठित होता; त्याच्या आईने त्याचे नाव याबेस असे ठेवून म्हटले की, “त्याला प्रसवताना मला फार क्लेश झाले.” 10 याबेसाने इस्राएलाच्या देवाजवळ वर मागितला तो असा : “तू माझे खरोखर कल्याण करशील, माझ्या मुलखाचा विस्तार वाढवशील आणि माझ्यावर कोणतेही अरिष्ट येऊन मी दुःखी न व्हावे म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती बरे होईल!” त्याने मागितलेला हा वर देवाने त्याला दिला. 11 शूहाचा भाऊ कलूब ह्याला महीर झाला; हा एष्टोनाचा बाप. 12 एष्टोनास बेथ-राफा, पासेहा आणि ईर-नाहाश ह्याचा बाप तहिन्ना हे झाले. हे रेखा येथील लोक होत. 13 कनाजाचे पुत्र अथनिएल व सराया; अथनिएलाचा पुत्र हथथ; आणि म्योनोथाय. 14 म्योनोथायास अफ्रा झाला; सरायास यवाब झाला; हा यवाब गे-हराशीम कारागिरांचा मूळ पुरुष होय. 15 यफुन्नेचा पुत्र कालेब ह्याचे पुत्र इरू, एला व नाम, एला कुळातले लोक आणि कनज हे ह्याच्यापासून झाले. 16 यहल्ललेल ह्याचे पुत्र : जीफ, जीफा, तीर्या व असरेल. 17 एज्राचे पुत्र येथेर, मेरेद. येफेर व यालोन. फारोची कन्या बिथ्या जी मेरेदाने केली होती तिची ही संतती, तिला मिर्याम, शम्माय व एष्टमोवाचा बाप इश्बह हे झाले. 18 त्याच्या यहूदीण बायकोपासून त्याला गदोराचा बाप येरेद, सोखोचा बाप हेबेर व जानोहाचा बाप यकूथीएल हे झाले. 19 नहमाची बहीण होदीयाची बायको झाली, तिला गार्मीकर कईला, त्याचा बाप व माकाथी एष्टमोवा हे झाले. 20 शिमोनाचे पुत्र अम्नोन, रिन्ना, बेन-हानान व तिलोन आणि इशीचे पुत्र जोहेथ व बेन-जोहेथ. 21 यहूदाचा पुत्र शेला ह्याच्यापासून लेखाचा बाप एर, मारेशाचा बाप लादा आणि तलम सणाचे कसबाचे काम करणार्या अश्बेच्या घराण्यात ही कुळे उत्पन्न झाली. 22 तसेच त्याच्यापासून योकीम, कोजेबा येथील लोक, योवाश, मवाबावर सत्ता चालवणारे साराफ व याशूबी-लेहेम हे निपजले. हा प्राचीन वृत्तान्त होय. 23 हे कुंभार असून नताईम व गदेरा येथे राहत असत; ते राजाचे कामकाज करून त्याच्याकडे राहत असत. शिमोनाचे वंशज 24 शिमोनाचे पुत्र : नमुवेल, यामीन, यारीब, जेरह व शौल; 25 त्याचा पुत्र शल्लूम; त्याचा पुत्र मिबसाम; त्याचा पुत्र मिश्मा. 26 मिश्माची संतती : त्याचा पुत्र हम्मूएल, त्याचा पुत्र जक्कूर, त्याचा पुत्र शिमी. 27 शिमीस सोळा पुत्र व सहा कन्या झाल्या; पण त्याच्या भावांना फारशी संतती झाली नाही आणि त्यांचा वंश यहूदाच्या वंशाप्रमाणे वृद्धी पावला नाही. 28 ते वस्ती करून राहिले ती गावे ही : बैर-शेबा, मोलादा व हसर-शुवाल, 29 बिल्हा, असेम, तोलाद, 30 बथुवेल, हर्मा, सिकलाग, 31 बेथ-मर्काबोथ, हसर-सुसीम, बेथ-बिरी व शाराईम. दाविदाच्या कारकिर्दीपर्यंत ही त्यांची नगरे होती. 32 त्यांची नावे एटाम, अईन, रिम्मोन, तोखेन आणि आशान अशी पाच नगरे; 33 आणि बालापर्यंतची त्याच नगरांच्या आसपासची खेडीपाडी; त्यांची वसतिस्थाने व वंशावळ्या ह्या होत. 34 मेशोबाब, यम्लेक व योशा बिन अमस्या; 35 योएल, येहू बिन योशिब्या बिन सराया बिन असिएल; 36 एल्योवेनाय, याकोबा, यशोहाया, असाया, अदिएल, यशीमिएल व बनाया; 37 जीजा बिन शिफी बिन अल्लोन बिन यदाया बिन शिम्री बिन शमाया; 38 ज्यांची नावे येथे दाखल केली आहेत ते सर्व आपापल्या कुळांचे प्रमुख होते; त्यांच्या घराण्यांची झपाट्याने वाढ झाली. 39 ते आपल्या शेरडामेंढरांसाठी चारा शोधायला गदोर घाटात खोर्याच्या पूर्वेपर्यंत गेले. 40 तेथे त्यांना कसदार व उत्तम चारा सापडला, आणि तो देश विस्तीर्ण असून शांत व निर्भय होता; तेथे पूर्वीपासून हामाचे वंशज राहत असत. 41 ज्यांची नावे वर दाखल केली आहेत त्यांनी यहूदाचा राजा हिज्कीया ह्याच्या कारकिर्दीत तेथे येऊन तेथील मूनी नावाच्या लोकांचा त्यांच्या डेर्यांसहित अगदी संहार करून ते त्यांच्या ठिकाणी आजपर्यंत वसले आहेत; कारण त्या ठिकाणी त्यांच्या शेरडामेंढरांसाठी चारा होता. 42 त्यांच्यापैकी म्हणजे शिमोनाच्या वंशजांतल्या पाचशे पुरुषांनी ईशीचे पुत्र पलट्या, निरय्या, रफाया व उज्जीएल ह्यांना आपले नायक केले आणि ते सेईर पहाडावर गेले. 43 तेथे जे अमालेकी उरले होते त्यांचा संहार करून तेथे ते आजवर वस्ती करून आहेत. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India