१ इतिहास 3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)दाविदाचे मुलगे ( २ शमु. 3:2-5 ; 5:13-16 ; १ इति. 14:3-7 ) 1 दाविदाला हेब्रोन येथे पुत्र झाले ते हे : अहीनवाम इज्रेलकरणीपासून अम्नोन हा ज्येष्ठ पुत्र; अबीगईल कर्मेलकरीण हिच्यापासून दानीएल हा दुसरा पुत्र; 2 गश्शूरचा राजा तलमय ह्याची कन्या माका हिच्यापासून अबशालोम हा तिसरा; हग्गीथेचा पुत्र अदोनीया हा चौथा; 3 अबीटलेपासून शफाट्या हा पाचवा; व दाविदाची बायको एग्ला हिचा पुत्र इथ्रम हा सहावा. 4 हे सहा पुत्र त्याला हेब्रोन येथे झाले; तेथे त्याने सात वर्षे सहा महिने राज्य केले. यरुशलेमेत त्याने तेहेतीस वर्षे राज्य केले. 5 त्याला यरुशलेमेत पुत्र झाले ते हे : शिमा, शोबाब, नाथान व शलमोन, हे चार अम्मीएलाची कन्या बथशूवा हिला झाले; 6 इभार, अलीशामा, एलीफलेट, 7 नोगा, नेफेग, याफीय, 8 अलीशामा, एल्यादा व एलीफलेट असे नऊ. 9 हे सर्व दाविदाचे पुत्र होत; ह्यांखेरीज उपपत्नींपासून आणखी पुत्र झाले; त्यांची बहीण तामार. शलमोनाचे वंशज 10 शलमोनाचा पुत्र रहबाम; त्याचा पुत्र अबीया, त्याचा पुत्र आसा, त्याचा पुत्र यहोशाफाट; 11 त्याचा पुत्र योराम, त्याचा पुत्र अहज्या, त्याचा पुत्र योवाश; 12 त्याचा पुत्र अमस्या, त्याचा पुत्र अजर्या, त्याचा पुत्र योथाम; 13 त्याचा पुत्र आहाज, त्याचा पुत्र हिज्कीया, त्याचा पुत्र मनश्शे; 14 त्याचा पुत्र आमोन, त्याचा पुत्र योशीया. 15 योशीयाचे पुत्र : ज्येष्ठ योहानान, दुसरा यहोयाकीम, तिसरा सिद्कीया व चौथा शल्लूम. 16 यहोयाकीमाचे पुत्र : त्याचा पुत्र यखन्या, त्याचा पुत्र सिद्कीया. 17 बंदिवान यखन्या ह्याचा पुत्र शलतीएल; 18 आणि मल्कीराम, पदाया, शेनस्सर, यकम्या, होशामा व नदब्या. 19 पदायाचे पुत्र : जरूब्बाबेल व शिमी; जरूब्बाबेलचे पुत्र : मशुल्लाम व हनन्या; त्यांची बहीण शलोमीथ; 20 आणि हशूबा, ओहेल, बरेख्या, हसद्या व यूशब-हेसेद हे पाच. 21 हनन्याचा पुत्र : पलट्या व यशाया; रफायाचे पुत्र, अर्णानाचे पुत्र, ओबद्याचे पुत्र, 22 शखन्याचा पुत्र शमाया; शमायाचे पुत्र हट्टूश, इगाल, बारीहा, निरय्या व शाफाट असे सहा. 23 निरय्याचे पुत्र : एल्योवेनय, हिज्कीया व अज्रिकाम असे तीन. 24 एल्योवेनय ह्याचे पुत्र : होदव्या, एल्याशीब, पलाया, अक्कूब, योहानान, दलाया व अनानी असे सात. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India