Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

१ इतिहास 27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


राज्यातील अंमलदार

1 इस्राएल लोकांची गणती म्हणजे पितृकुळांतील मुख्य पुरुष, सहस्रपती, शतपती व त्यांचे सरदार ह्यांची आणि जे वर्षभर प्रतिमासी कामावर हजर होते, सुटी मिळाली म्हणजे जात व अशा प्रकारे राजाची सेवाचाकरी करीत त्यांची प्रत्येक वर्गाप्रमाणे गणती चोवीस हजार होती.

2 पहिल्या महिन्याच्या पहिल्या वर्गावर जब्दीएलाचा पुत्र याशबाम होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.

3 तो पेरेसाच्या वंशातला होता व पहिल्या महिन्यात सैन्याच्या सर्व सरदारांचा मुख्य असे.

4 दुसर्‍या महिन्याच्या वर्गावर दोदय अहोही हा आणि त्याचा वर्ग असे; मिक्लोथ हा त्यांचा नायक होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.

5 तिसर्‍या महिन्याचा तिसरा सेनापती यहोयादा ह्याचा पुत्र बनाया, हा मुख्य याजक होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते,

6 तिसांमध्ये शूर व तिसांमध्ये वरिष्ठ असा जो होता तोच हा बनाया; त्याचा पुत्र अम्मीजाबाद हाही त्याच्याच वर्गात होता.

7 चौथ्या महिन्याचा चवथा सरदार यवाबाचा भाऊ असाएल हा होता; त्याच्यामागून त्याचा पुत्र जबद्या हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.

8 पाचव्या महिन्याचा पाचवा सरदार शम्हूथ इज्राही हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.

9 सहाव्या महिन्याचा सहावा सरदार इक्केशाचा पुत्र ईरा तकोई हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.

10 सातव्या महिन्याचा सातवा सरदार एफ्राइमाच्या वंशातला हेलस पलोनी हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.

11 आठव्या महिन्याचा आठवा सरदार जेरह वंशातला सिब्बखय हूशाथी हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.

12 नवव्या महिन्याचा नववा सरदार बन्यामिनी वंशातला अबियेजेर अनाथोथी हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.

13 दहाव्या महिन्याचा दहावा सरदार जेरह वंशातला महरय नटोफाथी हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.

14 अकराव्या महिन्याचा अकरावा सरदार एफ्राइमाच्या वंशातला बनाया पिराथोनी हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.

15 बाराव्या महिन्याचा बारावा सरदार अथनिएल वंशातला हेल्दय नटोफाथी हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.

16 आणखी इस्राएलाच्या वंशांवरील हे अधिकारी होते : रऊबेन वंशाचा अधिकारी जिख्रीचा पुत्र अलिएजर हा होता; शिमोन वंशाचा अधिकारी माकाचा पुत्र शफाट्या हा होता,

17 लेवी वंशाचा अधिकारी कमुवेलाचा पुत्र हशब्या; अहरोन वंशाचा अधिकारी सादोक;

18 यहूदा वंशाचा अधिकारी दाविदाच्या भाऊबंदातला अलीहू; इस्साखार वंशातला अधिकारी मीखाएलाचा पुत्र अम्री;

19 जबुलून वंशाचा अधिकारी ओबद्याचा पुत्र इश्माया; नफताली वंशाचा अधिकारी अज्रिएलाचा पुत्र यरीमोथ;

20 एफ्राईम वंशाचा अधिकारी अजर्‍याचा पुत्र होशेथ; मनश्शेच्या अर्ध्या वंशाचा अधिकारी पदायाचा पुत्र योएल;

21 गिलादातल्या मनश्शेच्या अर्ध्या वंशाचा अधिकारी जखर्‍याचा पुत्र इद्दो; बन्यामीन वंशाचा अधिकारी अबनेराचा पुत्र यासीएल;

22 दान वंशाचा अधिकारी यरोहामाचा पुत्र अजरेल; हे इस्राएलाच्या वंशाचे सरदार होते.

23 तथापि दाविदाने वीस वर्षांचे व त्यांहून कमी वयाचे लोक ह्यांची गणती केली नाही. कारण इस्राएलाची संख्या आकाशातील तार्‍यांप्रमाणे वाढवीन असे परमेश्वराने म्हटले होते.

24 सरूवेचा पुत्र यवाब हा गणती करू लागला, पण त्याने ते काम पूर्ण केले नाही; कारण त्यामुळे देवाचा कोप इस्राएलावर भडकला; ही गणती दावीद राजाच्या बखरीत लिहिलेली नाही.

25 राजाच्या भांडारावर अदीएलाचा पुत्र अजमावेथ हा होता; आणि शेतातल्या, नगरातल्या, गावातल्या व किल्ल्यातल्या भांडारांवर उज्जीयाचा पुत्र योनाथान हा होता;

26 जमिनीची लागवड करणार्‍या शेतकर्‍यांवर कलूबाचा पुत्र एज्री हा होता;

27 द्राक्षाच्या मळ्यावर शीमी रामाथी हा होता; आणि द्राक्षाच्या मळ्यांच्या उत्पन्नावर व द्राक्षारसाच्या कोठ्यांवर जब्दी शिफमी हा होता;

28 जैतून झाडांवर व सखल प्रदेशातील उंबराच्या झाडांवर बाल-हानान गदेरी हा होता; तेलाच्या कोठ्यांवर योवाश हा होता;

29 जी गुरे शारोनात चरत असत त्यांवर शित्रय शारोनी हा होता; खोर्‍यातल्या गुरांवर अदलय ह्याचा पुत्र शाफाट हा होता;

30 उंटांवर ओबील इश्माएली हा होता; गाढवांवर येहद्या मेरोनोथी हा होता;

31 आणि मेंढरांवर याजीज हाग्री हा होता; हे दावीद राजाच्या धनावर अधिकारी होते.

32 दाविदाचा चुलता योनाथान हा मंत्री असून मोठा समजूतदार व लेखक होता; हखमोन्याचा पुत्र यहीएल राजपुत्रांबरोबर असे;

33 अहीथोफेल हा राजाचा मंत्री होता; आणि हूशय अर्की हा राजाचा मित्र होता.

34 अहीथोफेलामागून बनायाचा पुत्र यहोयादा व अब्याथार हे मंत्री झाले; आणि राजाचा सेनापती यवाब हा होता.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan