Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

१ इतिहास 26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 द्वारपाळांचे वर्ग : कोरहाचे वंशज, आसाफाच्या वंशातला कोरहाचा पुत्र मशेलेम्या;

2 मशेलेम्याचे पुत्र : जखर्‍या ज्येष्ठ, यदिएल दुसरा, जबद्या तिसरा, यथनिएल चौथा,

3 अलाम पांचवा, यहोहानान सहावा व एल्योवेनय सातवा;

4 ओबेद-अदोमचे पुत्र : शमाया ज्येष्ठ, यहोजाबाद दुसरा, यवाह तिसरा, साखार चौथा, नथनेल पाचवा,

5 अम्मीएल सहावा, इस्साखार सातवा, पउलथय आठवा; देवाने त्याला बरकत दिली होती.

6 त्याचा पुत्र शमाया ह्याला पुत्र झाले; ते महावीर असल्यामुळे त्यांची त्यांच्या पितृकुळावर सत्ता होती.

7 शमायाचे पुत्र : अथनी, रफाएल, ओबेद, एलजाबाद; आणि त्यांचे बंधू अलीहू व समख्या हे बलवान होते.

8 हे सर्व ओबेद-अदोमाच्या वंशातले; हे, ह्यांचे पुत्र व भाऊबंद सेवेच्या कामात बलवान व जोमदार होते; असे ओबेद अदोमाचे बासष्ट वंशज होते.

9 आणि मशेलेम्याचे पुत्र व भाऊबंद मिळून अठरा बलवान पुरुष होते.

10 मरारीच्या वंशातला होसा ह्याचे पुत्र : शिम्री मुख्य; हा ज्येष्ठ नसताही त्याच्या बापाने त्याला मुख्य केले होते;

11 हिल्कीया दुसरा, टबल्या तिसरा, जखर्‍या चौथा, असे होसा ह्याचे पुत्र व भाऊबंद मिळून तेरा होते.

12 द्वारपाळांचे वर्ग ह्या मुख्य पुरुषांतले होते; आपल्या भाऊबंदांबरोबर तेही परमेश्वराच्या मंदिरात सेवा करीत.

13 त्यांतल्या लहानथोरांनी आपापल्या पितृकुळांप्रमाणे एकेका द्वारासंबंधाने चिठ्ठी टाकली.

14 पूर्वद्वाराची चिठ्ठी शलेम्याचा नावाची निघाली. त्यांनी त्याचा पुत्र जखर्‍या जो सुज्ञ मंत्री होता त्याच्या नावाची चिठ्ठी टाकली ती उत्तरद्वाराची निघाली.

15 दक्षिणद्वाराची चिठ्ठी ओबेद-अदोम ह्याच्या नावाची निघाली, त्याच्या मुलांच्या नावावर भांडारगृहाची चिठ्ठी निघाली.

16 शुप्पीम व होसा ह्यांच्या नावांची चिठ्ठी पश्‍चिमद्वाराची निघाली; शल्लेकेथ नावाच्या द्वाराजवळ चढून जाण्याच्या सडकेवर समोरासमोर त्यांनी पहारा करावा असे ठरले.

17 पूर्वेच्या बाजूस सहा लेवी, उत्तरेस रोजचे चार व दक्षिणेस रोजचे चार व भांडारगृहावर दोन-दोन असे नेमले.

18 पश्‍चिमेस परवार (मंदिराचे शिवार) ह्याच्यासाठी सडकेजवळ चार व खुद्द परवार येथे दोन.

19 हे द्वारपाळांचे वर्ग होत; त्यांतले काही कोरह वंशातले व काही मरारी वंशातले होते.

20 लेव्यांपैकी अहिया हा देवमंदिराच्या भांडारांवर व देवाला वाहिलेल्या वस्तूंच्या भांडारावर होता.

21 लादानाचे वंशज : लादान गेर्षोनी ह्यांच्या पितृकुळातला प्रमुख पुरुष यहीएली.

22 यहीएलीचे पुत्र जेथाम व त्याचा भाऊ योएल; हे परमेश्वराच्या मंदिराच्या भांडारगृहांवर होते.

23 अम्रामी, इसहारी, हेब्रोनी, उज्जीएली ह्यांपैकी काही होते,

24 आणि अबुएल बिन गेर्षोम बिन मोशे भांडारांवर नायक होता.

25 त्याचे भाऊबंद हे : अलियेजराचा पुत्र रहब्या, त्याचा पुत्र यशाया, त्याचा पुत्र योराम, त्याचा पुत्र जिख्री व त्याचा पुत्र शलोमोथ.

26 दावीद राजा, पितृकुळांचे मुख्य पुरुष, सहस्रपती, शतपती, व मुख्य सेनापती ह्यांनी देवाला वाहिलेल्या वस्तूंच्या भांडारांवर शलोमोथ व त्याचे भाऊबंद ह्यांना नेमले होते.

27 लढाईत जी लूट त्यांना मिळत असे तिच्यापैकी काही परमेश्वराचे मंदिर दुरुस्त करण्यासाठी ते समर्पण करीत.

28 शमुवेल द्रष्टा, कीशाचा पुत्र शौल, नेराचा पुत्र अबनेर, आणि सरूवेचा पुत्र यवाब ह्यांनी ज्या वस्तू समर्पित केल्या होत्या त्या व इतरांनी ज्या समर्पित केल्या होत्या त्या सर्व शलोमोथ व त्याचे बांधव ह्यांच्या हवाली केल्या होत्या.

29 इसहार्‍यांपैकी कनन्या व त्याचे वंशज ह्यांना इस्राएलाच्या सरदारीचे व न्यायाचे बाहेरले काम चालवण्यासाठी नेमले होते.

30 हेब्रोन्यांपैकी हशब्या व त्याचे भाऊबंद एक हजार सातशे हे वीर असून ते यार्देनेच्या पश्‍चिमेस परमेश्वराच्या सर्व सेवेसंबंधाने व राज्याच्या कामगिरीसंबंधाने इस्राएलावर देखरेख करणारे होते.

31 हेब्रोन्यांतला यरीया हा त्यांच्या पितृकुळांप्रमाणे त्यांचा मुख्य होता. दाविदाच्या कारकिर्दीच्या चाळिसाव्या वर्षी त्यांचा शोध केला तेव्हा त्यांतले काही शूर वीर गिलादातल्या याजेरात सापडले.

32 त्यांचे बांधव वीर असून आपापल्या पितृकुळांचे मुख्य होते; ते दोन हजार सातशे होते. त्यांना दावीद राजाने देवाच्या कार्यासंबंधाने व राजाच्या सर्व कारभारासंबंधाने रऊबेनी, गादी, व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांच्यावर देखरेख करण्याच्या कामावर नेमले होते.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan