१ इतिहास 25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)गायनवादन करणार्यांचे गट 1 दावीद व सेनापती ह्यांनी आसाफ, हेमान व यदूथून ह्यांच्या वंशजांपैकी कित्येकांना वीणा, सारंगी व झांजा वाजवून संदेश देण्याची सेवा करावी म्हणून वेगळे केले. सेवेचे हे काम करणार्यांची संख्या येणेप्रमाणे : 2 आसाफाच्या वंशातले जक्कूर, योसेफ, नथन्या व अशेराला हे आसाफाचे पुत्र; राजाज्ञेप्रमाणे आसाफाच्या हाताखाली हे संदेश देत असत. 3 यदूथूनाचे वंशज : यदूथूनाचे पुत्र गदल्या, सरी, यशाया, हशब्या व मत्तिथ्या असे सहा;1 त्यांचा बाप यदूथून वीणा वाजवून परमेश्वराचे उपकारस्मरण व स्तवन करून संदेश देत असे, ते त्याच्या हाताखाली असत. 4 हेमानाचे वंशज : हेमानाचे पुत्र बुक्कीया, मत्तन्या, उज्जीएल, शबुएल, यरीमोथ, हनन्या, हनानी, अलियाथा, गिद्दल्ती, रोममती-एजेर, याश्बकाशा, मल्लोथी, होथीर व महजियोथ; 5 राजाचा द्रष्टा हेमान, जो रणशिंग वाजवून परमेश्वराचे वचन सांगत असे, त्याचे हे पुत्र; देवाने हेमानाला चौदा पुत्र व तीन कन्या दिल्या. 6 हे सर्व परमेश्वराच्या मंदिरात आपापल्या बापाच्या हाताखाली राहून देवाच्या मंदिराच्या सेवेत झांजा, सारंगी व वीणा वाजवून गात असत; आसाफ, यदूथून व हेमान हे राजाच्या आज्ञेत असत. 7 ते व त्यांचे भाऊबंद परमेश्वराप्रीत्यर्थ गाण्याचे शिक्षण मिळून तरबेज झालेले असे दोनशे अठ्ठ्याऐंशी होते. 8 त्या सर्वांनी, लहानमोठ्यांनी आणि गुरुशिष्यांनी चिठ्ठ्या टाकून आपापली कामे वाटून घेतली. 9 तेव्हा पहिली चिठ्ठी आसाफाकडील योसेफ ह्याची निघाली; दुसरी गदल्याची; तो, त्याचे भाऊबंद व पुत्र मिळून बारा; 10 तिसरी जक्कूराची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा; 11 चौथी इस्रीची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा; 12 पाचवी नथन्याची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा; 13 सहावी बुक्कीयाची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा; 14 सातवी यशरेलाची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा; 15 आठवी यशायाची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा; 16 नववी मत्तन्याची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा; 17 दहावी शिमीची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा; 18 अकरावी अजरेलाची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा; 19 बारावी हशब्याची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा; 20 तेरावी शूबाएलाची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा; 21 चौदावी मतिथ्याची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा; 22 पंधरावी यरेमोथाची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा; 23 सोळावी हनन्याची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा; 24 सतरावी याश्बाकाशाची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा; 25 अठरावी हनानीची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा; 26 एकोणिसावी मल्लोथीची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा; 27 विसावी अलीयाथाची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा; 28 एकविसावी होथीराची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा; 29 बाविसावी गिद्दल्तीची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा; 30 तेविसावी महजियोथाची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा; 31 आणि चोविसावी रोममती-एजेराची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून बारा; द्वारपाळ आणि देखरेख करणारे |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India