Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

१ इतिहास 23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 दावीद आता वृद्ध व वयातीत झाला होता, म्हणून त्याने आपला पुत्र शलमोन ह्याला इस्राएलावर राजा नेमले. लेवी आणि याजक ह्यांची विभागणी व त्यांची कामे

2 त्याने इस्राएलाचे सर्व सरदार, याजक व लेवी ह्यांना एकत्र केले.

3 तीस वर्षांचे व त्यांहून अधिक वयाचे जितके लेवी होते त्यांची गणती केली; त्यांची शिरगणती केली ती अडतीस हजार भरली.

4 त्यांतले चोवीस हजार परमेश्वराच्या मंदिराच्या कामाची देखरेख करण्यासाठी नेमले; सहा हजार अंमलदार व न्यायाधीश होते;

5 चार हजार द्वारपाळ होते; आणि परमेश्वराची स्तोत्रे म्हणणार्‍यांसाठी दाविदाने जी वाद्ये केली होती त्यांवर परमेश्वराचे स्तवन करण्यासाठी चार हजार माणसे नेमली.

6 लेवीचे पुत्र गेर्षोन, कहाथ व मरारी ह्यांच्या कुळांप्रमाणे दाविदाने त्यांचे वर्ग केले होते.

7 गेर्षोन्यातले लादान व शिमी;

8 लादानाचे पुत्र यहीएल मुख्य व जेथाम व योएल असे तीन;

9 शिमीचे पुत्र शलोमोथ, हजिएल व हारान असे तीन; हे लादानाच्या पितृकुळांचे मुख्य होते;

10 आणि शिमीचे पुत्र यहथ, जीजा, यऊश व बरीया; हे चौघे शिमीचे पुत्र;

11 यहथ हा प्रमुख व जीजा हा दुसरा; यऊश व बरीया ह्यांची पुत्रसंतती बहुत नव्हती, म्हणून त्यांचे एकच पितृकुळ ठरवले.

12 कहाथाचे पुत्र अम्रान, इसहार, हेब्रोन व उज्जीएल असे चार;

13 अम्रामाचे पुत्र अहरोन व मोशे; अहरोनास वेगळे करण्यात आले ते अशासाठी की त्याने व त्याच्या वंशजांनी परमपवित्र वस्तू निरंतर पवित्र राखाव्यात; परमेश्वरासमोर निरंतर धूप जाळावा, त्याची सेवाचाकरी करावी व त्याच्या नामाने आशीर्वाद द्यावा.

14 देवाचा माणूस मोशे ह्याचे पुत्र लेवी वंशात मोडत.

15 मोशेचे पुत्र गेर्षोम व अलियेजर.

16 गेर्षोमाच्या पुत्रांमध्ये शबुएल मुख्य,

17 आणि अलियेजराच्या पुत्रांमध्ये रहब्या मुख्य; अलियेजराला दुसरे पुत्र झाले नाहीत, परंतु रहब्याचे पुत्र बहुत होते.

18 इसहाराच्या पुत्रांमध्ये शलोमीथ मुख्य;

19 हेब्रोनाच्या पुत्रांमध्ये यरीया मुख्य; व अमर्‍या दुसरा, यहजिएल तिसरा व यकमाम् चौथा;

20 उज्जीएलाच्या पुत्रांमध्ये मीखा मुख्य व इश्शिया दुसरा;

21 मरारीचे पुत्र महली व मूशी; महलीचे पुत्र एलाजार व कीश;

22 एलाजार निपुत्रिक मेला, त्याला केवळ कन्या होत्या; त्यांचे भाऊबंद कीशाचे पुत्र ह्यांनी त्यांच्याशी विवाह केला.

23 मूशीचे पुत्र; महली, एदर व यरेमोथ असे तीन.

24 लेव्याच्या पितृकुळातील मुख्य पुरुष हेच; त्यांची नावे घेऊन शिरगणती केली; ते वीस वर्षांचे व त्यांहून अधिक वयाचे असून परमेश्वराच्या मंदिरात सेवा करीत असत.

25 दावीद म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने आपल्या प्रजेस विसावा दिला आहे, व यरुशलेमात त्यांचा निरंतरचा निवास आहे;

26 निवासमंडप व त्यामधील सेवेची उपकरणे ही लेव्यांना पुन्हा वाहून नेण्याची जरूर पडणार नाही.”

27 दाविदाच्या शेवटल्या आज्ञेवरून वीस वर्षांच्या व त्यांहून अधिक वयाच्या लेव्यांची गणती झाली.

28 अहरोन वंशजांच्या हाताखाली परमेश्वराच्या मंदिराची अंगणे व कोठड्या ह्यांत सेवा करणे व सर्व पवित्र वस्तू शुद्ध राखणे हे देवाच्या मंदिरातील सेवेसंबंधीचे सर्व काम त्यांच्याकडे होते.

29 समर्पित भाकर, अन्नबलीसाठी सपीठ, बेखमीर पापड, तव्यावर भाजलेले अथवा मळलेले सर्वकाही सिद्ध करण्याचे व सर्व प्रकारचे मोजमाप करण्याचे काम त्यांच्याकडे होते.

30 सकाळ-संध्याकाळ परमेश्वराचे नित्य उपकारस्मरण व स्तवन करण्यास त्यांना उभे राहावे लागत असे.

31 तसेच शब्बाथाच्या व चंद्रदर्शनाच्या दिवशी व नेमलेल्या पर्वणीस ठरवलेल्या संख्येप्रमाणे नेहमी परमेश्वरासमोर उभे राहून सर्व होमबली त्यांना त्यास अर्पावे लागत.

32 परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेप्रीत्यर्थ दर्शनमंडपाचे व पवित्रस्थानाचे रक्षण करणे आणि त्यांचे भाऊबंद अहरोन वंशज ह्यांना नेमून दिलेल्या कामी मदत करणे हे त्यांचे काम होते.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan