स्तोत्रसंहिता 98 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठीदेवाच्या नीतिमत्त्वाबद्दल स्तुती 1 परमेश्वरास नवीन गीत गा, कारण त्याने आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत; त्याने आपल्या उजव्या हाताने आणि आपल्या पवित्र बाहूने आम्हास विजय दिला आहे. 2 परमेश्वराने आपले तारण कळवले आहे; त्याने सर्व राष्ट्रांच्यासमोर आपले न्यायीपण उघडपणे दाखवले आहे. 3 त्याने इस्राएलाच्या घराण्यासाठी आपली निष्ठा आणि विश्वासाचा करार यांची आठवण केली; पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे. 4 अहो सर्व पृथ्वी, परमेश्वराचा जयजयकार करा; उच्च स्वराने आणि आनंदाने गा, स्तुतिगायन करा. 5 परमेश्वराचे स्तुतिगान वीणेवर करा, वीणेवर मधुर स्वराने गायन करा. 6 कर्णा आणि शिंगाच्या आवाजाने, परमेश्वर राजासमोर आनंदाने जयघोष करा. 7 समुद्र आणि त्यातील प्रत्येकगोष्ट गर्जना करोत, जग व त्यामध्ये राहणारे हर्षनाद करोत. 8 नद्या टाळ्या वाजवोत, आणि पर्वत हर्षनाद करोत. 9 परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यास येत आहे; तो न्यायीपणाने जगाचा आणि सरळपणाने राष्ट्रांचा न्याय करील. |
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.