स्तोत्रसंहिता 70 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठीमुक्ततेसाठी प्रार्थना स्तोत्र. 40:13-17 दाविदाचे स्तोत्र 1 हे देवा, मला सोडव. हे परमेश्वरा, लवकर ये आणि मला मदत कर. 2 जे माझा जीव घेऊ पाहतात, त्यांना लज्जित कर आणि गोंधळून टाक; माझ्या यातनेत आनंद मानणारे माघारी फिरोत आणि अपमानित होवोत; 3 जे मला अहाहा! अहाहा! असे म्हणतात, ते आपल्या लाजेने मागे फिरोत. 4 जे तुझा शोध घेतात ते सर्व तुझ्याठायी हर्षित आणि आनंदित होवोत; ज्यांना तुझे तारण प्रिय आहे, ते देवाची स्तुती असो असे नेहमी म्हणोत. 5 पण मी गरीब आणि गरजवंत आहे; हे देवा, माझ्याकडे त्वरीत ये; तू माझा सहाय्यक आणि मला सोडवणारा तूच आहेस. हे परमेश्वरा, उशीर करू नकोस. |
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.