स्तोत्रसंहिता 46 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठीदेव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य मुख्य गायकासाठी; कोरहाच्या मुलांचे आलामोथ सुरावर बसवलेले गाणे. 1 देव आमचा आश्रय आणि सामर्थ्य आहे, जो संकटात मदत करण्यास सिध्द असतो. 2 म्हणून जरी पृथ्वी बदलली, जरी पर्वत डगमगून समुद्राच्या हृदयात गेले, तरी आम्ही भिणार नाही. 3 जरी त्यांच्या लाटा गर्जल्या आणि खळबळल्या, आणि त्यांच्या उचंबळण्याने पर्वत थरथरले तरी आम्ही भिणार नाही. 4 तेथे एक नदी आहे, तिचे प्रवाह परात्पराच्या पवित्रस्थानाला निवासमंडपाला देवाच्या नगराला आनंदित करतात. 5 देव तिच्यामध्ये आहे; ती हलणारच नाही; देव तिला मदत करील आणि तो हे खूप लवकरच करील. 6 राष्ट्रे खळबळतील आणि राज्ये डगमगतील; तो आपला आवाज उंच करील आणि पृथ्वी वितळून जाईल. 7 सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रयस्थान आहे. 8 या, परमेश्वराची कृत्ये पाहा, त्याने पृथ्वीचा नाश कसा केला आहे. 9 तो पृथ्वीच्या सीमेपर्यंत लढाया थांबवतो; तो धनुष्य तोडतो आणि भाल्याचे तुकडे-तुकडे करतो; तो रथ जाळून टाकतो. 10 शांत व्हा आणि लक्षात ठेवा मीच देव आहे; राष्ट्रात मी उंचावला जाईन; मी पृथ्वीवर उंचावला जाईन. 11 सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे; याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. |
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.