स्तोत्रसंहिता 24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठीगौरवाचा राजा दाविदाचे स्तोत्र. 1 भूमी आणि तिच्यावरील परिपूर्णता परमेश्वराची आहे. जग आणि त्यातील सर्व राहणारे परमेश्वराचे आहेत. 2 कारण त्याने समुद्रावर तिचा पाया घातला, आणि जलांवर त्याने ती स्थापली. 3 परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? परमेश्वराच्या पवित्र मंदिरात कोण उभा राहू शकतो? 4 ज्याचे हात निर्मळ आहेत, ज्यांचे हृदय शुद्ध आहे, ज्याने आपला जीव खोटेपणाकडे उंचावला नाही, आणि ज्याने दुष्टपणाने शपथ वाहिली नाही. 5 तो परमेश्वराकडून आशीर्वाद प्राप्त करेल, आणि त्यालाच त्याच्या तारणाऱ्या देवापासून न्यायीपण मिळेल. 6 हिच पिढी त्यास शोधणारी आहे, जी याकोबाच्या देवाचे मुख शोधते. 7 अहो! वेशींनो, आपले मस्तक उंच करा. पुर्वकालीन द्वारांनो, उंच व्हा, म्हणजे गौरवशाली राजा आत येईल. 8 गौरवशाली राजा कोण आहे? तोच परमेश्वर, सामर्थ्यशाली आणि थोर आहे. 9 वेशींनो, तुमची मस्तके उंच करा. सर्वकाळच्या दरवाजांनो, तुम्ही उंच व्हा, म्हणजे गौरवशाली राजा आत येईल. 10 तो गौरवशाली राजा कोण आहे? सेनाधीश परमेश्वरच तो राजा आहे, तोच तो गौरवशाली राजा आहे. |
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.