स्तोत्रसंहिता 20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठीविजयासाठी प्रार्थना मुख्य गायकासाठी, दाविदाचे स्तोत्र. 1 परमेश्वर तुला संकटात साहाय्य करो, याकोबाच्या देवाचे नाव तुझे संरक्षण करो. 2 देव त्याच्या पवित्र स्थानातून तुम्हास मदत पाठवो. तो तुम्हास सियोनातून साहाय्य करो. 3 तो तुझ्या सर्व अर्पणांची आठवण ठेवो, आणि तुझे होमार्पण यज्ञ मान्य करो. 4 तो तुझ्या हृदयाच्या इच्छा मान्य करो, आणि तुझ्या सर्व योजना पूर्ण करो. 5 तेव्हा आम्ही तुझ्या तारणात हर्ष करू. आणि आमच्या देवाच्या नावात झेंडे उभारू. परमेश्वर तुझ्या सर्व विनंत्या पूर्ण करो. 6 परमेश्वर आपल्या अभिषिक्ताला तारतो, हे मी जाणले आहे. त्याच्या तारण करणाऱ्या उजव्या हाताच्या सामर्थ्याने, तो त्याच्या पवित्र स्वर्गातून त्यास उत्तर देईल. 7 काही त्यांच्या रथांवर भरंवसा ठेवतात, तर काही घोड्यांवर, परंतु आम्ही आमच्या परमेश्वर देवाला हाक मारू. 8 ते खाली आणले गेले आणि पडले, परंतु आम्ही उठू आणि ताठ उभे राहू! 9 हे परमेश्वरा तारण कर, आम्ही आरोळी करू त्या दिवशी राजा आम्हांला उत्तर देवो. |
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.