स्तोत्रसंहिता 15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठीदेवाच्या पवित्र डोंगरावरील रहिवासी दाविदाचे स्तोत्र. 1 हे परमेश्वरा, तुझ्या पवित्र तंबूत कोण राहू शकेल? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? 2 जो निर्दोषपणे चालतो आणि जे चांगले ते करतो, आणि आपल्या हृदयात सत्य बोलतो तो. 3 जो आपल्या जीभेने चुगली करत नाही, किंवा दुसऱ्यांची हानी करत नाही, किंवा आपल्या शेजाऱ्याचा अपमान करत नाही. 4 अधमाचा तिरस्कार करतो, परंतु जे परमेश्वराचे भय धरतात त्यांचा सन्मान करतो, जो वचन देऊन आपले अहीत झाले तरी मागे हटत नाही, 5 जेव्हा तो पैसे उधार देतो तेव्हा व्याज घेत नाही, जो निर्दोष लोकांविरूद्ध साक्ष देण्यासाठी लाच घेत नाही. तो, जो या गोष्टी करतो तो कधीही ढळणार नाही. |
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.