स्तोत्रसंहिता 149 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठीइस्त्राएलाने परमेश्वराची उपकारस्तुती करावी असा आदेश 1 परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वरास नवे गीत गा; विश्वासणाऱ्याच्या मंडळीत त्याचे गीत गा. 2 इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंदोत्सव करो. सियोनेचे लोक आपल्या राजाच्या ठायी आनंद करोत. 3 ते त्याच्या नावाची स्तुती नाचून करोत; ते त्याच्या स्तुतीचे गीत डफाने आणि वीणेने करो. 4 कारण परमेश्वर आपल्या लोकात आनंद घेत आहे; तो दीनांना तारणाने गौरवितो. 5 भक्त विजयाने हर्षभरित होवोत; ते आपल्या अंथरुणावरुन विजयासाठी गाणे गावो. 6 देवाची स्तुती त्यांच्या मुखात असो, आणि दुधारी तलवार त्यांच्या हातात असो. 7 यासाठी की त्यांनी राष्ट्रावर सूड उगवावा आणि लोकांस शिक्षा करावी. 8 ते त्यांच्या राजांना साखळंदडाने आणि त्यांच्या सरदारांना लोखंडी बेड्यांनी बांधतील. 9 ते लिहून ठेवलेला जो न्याय आहे तो अंमलात आणतील. हा त्याच्या सर्व विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आदर आहे. परमेश्वराची स्तुती करा. |
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.