स्तोत्रसंहिता 114 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठीआश्चर्यकारक निर्गमन निर्ग. 14:1-31 1 जेव्हा इस्राएल मिसरातून, याकोबाचे घराणे त्या परकी लोकांतून निघाले, 2 तेव्हा यहूदा त्याचे पवित्रस्थान झाला, इस्राएल त्याचे राज्य झाले. 3 समुद्राने पाहिले आणि पळाला; यार्देन मागे हटली. 4 पर्वतांनी मेंढ्यांसारख्या, टेकड्यांनी कोकरासारख्या उड्या मारल्या. 5 हे समुद्रा, तू का पळून गेलास? यार्देने तू का मागे हटलीस? 6 पर्वतांनो, तुम्ही मेंढ्यांसारख्या का उड्या मारता? लहान टेकड्यांनो, तुम्ही कोकरासारख्या का उड्या मारता? 7 हे पृथ्वी, तू प्रभूसमोर, याकोबाच्या देवासमोर थरथर काप. 8 तो खडक पाण्याच्या तळ्यात, कठीण खडक पाण्याच्या झऱ्यात बदलतो. |
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.