स्तोत्रसंहिता 113 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठीदीनाला उच्च केल्याबद्दल स्तुती 1 परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो तुम्ही त्याची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाची स्तुती करा. 2 आतापासून सदासर्वकाळ परमेश्वरावचे नाव धन्यवादित असो. 3 सूर्याच्या उगवतीपासून ते त्याच्या मावळतीपर्यंत, परमेश्वराच्या नावाची स्तुती होवो. 4 परमेश्वर सर्व राष्ट्रांच्या वरती उंचावला जावो, आणि त्याचे गौरव आकाशाच्यावरती पोहचो. 5 आमचा देव परमेश्वर यासारखे कोण आहे, त्याच्यावर कोणाचे राजासन आहे, 6 जो वरून खाली आकाश आणि पृथ्वीकडे पाहतो, 7 तो गरीबांना धुळीतून वर उचलतो आणि गरजवंताला राखेच्या ढिगाऱ्यातून वर काढतो. 8 अशा करता की, ते आपल्या अधिपतीच्या बरोबर, आपल्या अधिपतींच्याबरोबर बसावे. 9 अपत्यहीन स्त्रीला घर देऊन, तो मुलांची आनंदी आई करतो. परमेश्वराची स्तुती करा. |
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.