स्तोत्रसंहिता 110 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठीदेव राजाला राज्य देतो मत्त. 22:44 ; प्रेषि. 2:34-35 दाविदाचे स्तोत्र 1 माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो “तुझ्या शत्रूंना तुझे पादासन करीपर्यंत माझ्या उजव्या बाजूला बस.” 2 परमेश्वर म्हणतो, तुझ्या सामर्थ्याची काठी सियोनेपासून पुढे चालवील; तू आपल्या शत्रूंवर राज्य करशील. 3 तुझे वैभवशाली सामर्थ्य दाखवण्याच्या दिवशी पवित्र पर्वतावर तुझे लोक स्वसंतोषाने पुढे होतात, पहाटेच्या उदरातून आलेले दवासारखे तुझे तरुण तुला आहेत. 4 परमेश्वराने शपथ वाहिली आहे आणि तो बदलणार नाही, “तू मलकीसदेकाच्या प्रकाराप्रमाणे तू सर्वकाळ याजक आहेस.” 5 प्रभू तुझ्या उजव्या हाताला आहे. तो आपल्या क्रोधाच्या दिवशी राजांचा वध करील. 6 तो राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील; तो प्रेतांनी दऱ्या भरील; तो अनेक राष्ट्रात नेत्यांना मारील. 7 तो मार्गाने चालत असता झऱ्यातले पाणी पिईल, आणि मग तो विजयानंतर आपले डोके वर उचलेल. |
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.