इय्योब 25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठीदेवापुढे मानव न्यायी ठरत नाही असे बिल्ददचे म्हणणे 1 नंतर बिल्दद शूहीने उत्तर दिले व तो म्हणाला, 2 “अधीकार चालवणे व भीती दाखवणे हे देवाकडेच आहे, तो स्वर्गाच्या उच्च स्थानामध्ये शांती राखतो. 3 त्याच्या सैन्याची मोजणी करीता येईल काय? कोणावर त्याचा प्रकाश पडत नाही? 4 मनुष्य देवापुढे नितीमान कसा ठरेल? स्त्रीपासुन जन्मलेला निर्मळ कसा ठरेल, व त्यास स्विकारले जाईल. 5 पाहा, त्याच्या दृष्टीने चंद्र सुध्दा तेजोमय नाही. त्याच्या दृष्टीला तारे देखील पवित्र वाटत नाहीत. 6 मग मनुष्य किती कमी आहे, एखाद्या अळीप्रमाणे आहे. तो जंतूप्रमाणे आहे.” |
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.