यशायाह 18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठीकूशाविषयीचे भाकित 1 कूशातील नद्यांच्या पलीकडील सळसळणाऱ्या पंखाच्या देशा हायहाय; 2 जो समुद्रातून, लव्हाळ्यांच्या पात्रातून जलावर वकील पाठवतो. शीघ्रगती दूतांनो, त्या उंच आणि मनमिळावू राष्ट्रांकडे, जे लोक भीतीपासून दूर व जवळ आहेत त्यांच्याकडे, जे बलवान व अजिंक्य राष्ट्र, ज्याची भूमी नद्यांनी विभागली आहे त्याच्याकडे जा, 3 अहो जगातल्या सर्व रहिवाश्यांनो आणि जे कोणी पृथ्वीवर राहणाऱ्यांनो, जेव्हा पर्वतावरून निशाण उंचविण्यात येईल तेव्हा पाहा; आणि जेव्हा कर्णा फुंकण्यात येईल तेव्हा ऐका. 4 परमेश्वराने मला हे सांगितले आहे की, जसे सूर्याच्या प्रकाशात उकळणारी उष्णता असते अथवा जसे कापणीच्या उन्हात दहिवरयुक्त अभ्र येते, तसे मी आपल्या निवासस्थानातून शांतपणे निरीक्षण करीन. 5 कापणीच्यापूर्वी, जेव्हा बहार संपल्यावर फुले द्राक्षात पिकू लागतात, तेव्हा तो कोयत्याने डहाळ्या कापील व खाली काढून टाकेल आणि पसरलेल्या फांद्या काढून टाकेल. 6 पर्वतावरील पक्ष्यांसाठी आणि पृथ्वीवरील जनावरांसाठी त्या एकत्र टाकून ठेवल्या जातील. उन्हाळ्यात पक्षी त्यामध्ये राहतील आणि थंडीत पृथ्वीवरील जनावरे त्यावर हिवाळा घालवतील.” 7 त्या वेळेला, उंच आणि मनमिळावू लोक, भीतीपासून दूर व जवळ असे बलवान व अजिंक्य राष्ट्र, ज्या राष्ट्राची भूमी नद्यांनी विभागलेली आहे ते, सेनाधीश परमेश्वराचे नाव दिलेल्या स्थळी म्हणजे सीयोन डोंगरावर सेनाधीश पमेश्वराला स्वतःचा नजराणा म्हणून अर्पण करण्यास येतील. |
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.