Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

एज्रा 10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी


परराष्ट्रीय बायकामुळे ह्यांना घालवून देणे

1 एज्रा प्रार्थना करत असतांना आणि पापांची कबुली देत असतांना देवाच्या मंदिरापुढे पडून रडत व आक्रोश करत होता त्यावेळी इस्राएली बायका-पुरुष, मुले यांचा मोठा समुदाय त्याच्या भोवती जमला होता ते लोक मोठ्याने रडत होते

2 त्यावेळी एलाम वंशातल्या यहीएलाचा मुलगा शखन्या एज्राला म्हणाला, “आपण देवाविरूद्ध अपराध केला आहे आणि दुसऱ्या देशातील परक्या स्त्रियांसोबत राहत आहो. तरी आता याविषयी इस्राएलाला अजून आशा आहे.

3 तर आता, प्रभूच्या मसलतीप्रमाणे आणि आमच्या देवाच्या आज्ञेवरून थरथर कापतात त्यांच्या मताप्रमाणे सर्व त्या स्त्रिया आणि त्यांची संतती यांना देशाबाहेर घालवून देण्याची आपल्या देवाशी करार करावा. हे नियमशास्त्राप्रमाणे करावे.

4 आता ऊठ ही तुझी जबाबदारी आहे. आम्ही तुझ्याबरोबर आहोत. धैर्य धर आणि हे कर.”

5 तेव्हा एज्रा उठला, प्रमुख यजाक, लेवी आणि सर्व इस्राएली लोक यांच्याकडून त्यांनी त्या वचनाप्रमाणे वागावे अशी शपथ घेतली. त्यांनी वचन दिले.

6 मग एज्रा देवाच्या मंदिराच्या समोरच्या भागातून उठून एल्याशीबाचा मुलगा यहोहानान याच्या खोलीत गेला. यहोहानाने एज्रा समोर अन्नपाण्याला स्पर्शही केला नाही. कारण तो बंदीवासातून आलेल्या अविश्वासणाऱ्यासाठी शोक करीत होता.

7 मग त्याने यहूदा आणि यरूशलेमेच्या प्रत्येक ठिकाणी बोलावणे पाठवले. बंदिवासातून आलेल्या समस्त यहूदी लोकांस त्याने यरूशलेमेमध्ये जमायला सांगितले.

8 आणि जो कोणी अधिकाऱ्यांच्या आणि वडीलांच्या मसलतीप्रमाणे तीन दिवसाच्या आत यरूशलेमेला येणार नाही त्याची सर्व मालमत्ता जप्त होईल आणि पकडून नेलेल्या अशा मोठ्या मंडळीतून त्या लोकांस हद्दपार करावे.

9 त्यानुसार यहूदा आणि बन्यामीन यांच्या घराण्यातील सर्व पुरुषमंडळी तीन दिवसाच्या आत यरूशलेमात जमली. तो नवव्या महिन्याचा विसावा दिवस होता. हे सर्व लोक देवाच्या घराच्या चौकातील प्रचंड पाऊसामुळे आणि देवाच्या वचनामुळे थरथर कापत उभे होते.

10 एज्रा याजक त्यांच्यासमोर उभा राहून म्हणाला, “तुम्ही देवाचे वचन पाळले नाही. परक्या स्त्रियांशी तुम्ही विवाह केलेत. या कृत्यामुळे इस्राएलाच्या अपराधात तुम्ही भर टाकली आहे.

11 तर आता तुम्ही परमेश्वर आपल्या पूर्वजांचा देव याच्याजवळ पाप कबूल करून त्यास इच्छेप्रमाणे ते करा. देशातल्या लोकांपासून आणि परक्या स्त्रिया यांच्यापासून वेगळे व्हा.”

12 यावर त्या जमावाने मोठ्या आवाजात उत्तर दिले की, “तू जसे सांगितले तसे आम्ही करू.

13 पण आम्ही पुष्कळजण आहोत शिवाय हा पावसाळा आहे त्यामुळे आम्हास बाहेर थांबण्याची शक्ती नाही. हे काम एकदोन दिवसाचे नाही. कारण या प्रकरणात आम्ही मोठ्या प्रमाणात मर्यादेचे उल्लंघन केले आहे.

14 या समुदायाच्यावतीने आमच्यातूनच काहींना अधिकारी नेमावे. प्रत्येक नगरात ज्यांनी परक्या बायकांशी लग्ने केली आहेत त्यांनी यरूशलेमेला नेमलेल्या वेळी यावे त्या नगरातील न्यायाधीश आणि वडील मंडळी यांनीही त्यांच्याबरोबर यावे. असे झाले की मग देवाचा आमच्यावरचा क्रोध जाईल.”

15 असाएलाचा मुलगा योनाथान आणि तिकवाचा मुलगा यहज्या या गोष्टी विरूद्ध उभे राहिले आणि तसेच मशुल्लाम व शब्बथई लेव्यांनी त्यांना पाठिंबा दिला.

16 बंदीवासातून आलेल्या लोकांनी हे केले. एज्राने प्रत्येक घराण्यातून एकेका प्रमुख व्यक्तीची नेमणूक केली. त्या प्रत्येकाच्या नावाने निवडले गेली. हे नियुक्त केलेले सर्वजण दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी प्रत्येक प्रकरणाचा बारकाईने विचार करायला बसले

17 आणि पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी मिश्रविवाहांची चौकशी समाप्त झाली.

18 याजकांच्या ज्या वंशजांनी परकीय स्त्रियांशी विवाह केले त्यांची नावे पुढीलप्रमाणे, योसादाकाचा मुलगा येशूवा याच्या वंशातील आणि त्याच्या भाऊबंदांच्या वंशातील मासेया, अलियेजर, यारीब, गदल्या.

19 यासर्वांनी आपापल्या बायकांना पाठवून द्यायचे कबूल केले आणि दोषाबद्दल कळपातला एडका अर्पण केला.

20 इम्मेरच्या वंशातले हनानी व जबद्या,

21 हारीमच्या वंशातले मासेया, एलीया, शमाया, यहीएल व उज्जीया,

22 पशूहरच्या वंशातले एल्योवेनय, मासेया, इश्माएल, नथनेल, योजाबाद, एलासा.

23 लेव्यांपैकी योजाबाद, शिमी, कलाया उर्फ कलीता, पथह्या, यहूदा आणि अलियेजर.

24 गायकांपैकी एल्याशीब, द्वारपालांमधले, शल्लूम, तेलेम, ऊरी.

25 इस्राएलामधले परोशाच्या वंशातले रम्या व यिज्जीया, मल्कीया, मियानीन, एलाजार, मल्कीया, बनाया.

26 एलामच्या वंशातले मत्तन्या, जखऱ्या, यहीएल, अब्दी, यरेमोथ व एलीया,

27 जत्तूच्या वंशातले एल्योवेनय, एल्याशीब, मत्तन्या, यरेमोथ, जाबाद, अजीजा,

28 बेबाईच्या वंशातील यहोहानान, हनन्या, जब्बइ, अथलइ

29 बानीच्या वंशातील मशुल्लाम, मल्लूख, अदाया, याशूब, शाल आणि रामोथ.

30 पहथ-मवाबच्या वंशातील अदना, कलाल, बनाया, मासेया, मत्तन्या, बसालेल, बिन्नुई, मनश्शे,

31 आणि हारीमच्या वंशातील अलियेजर, इश्शीया, मल्कीया, शमाया, शिमोन,

32 बन्यामीन, मल्लूख, शमऱ्या.

33 हाशूमच्या वंशातील मत्तनई, मत्तथा, जाबाद, अलीफलेट, यरेमई, मनश्शे, शिमी,

34 बानीच्या वंशातले मादइ, अम्राम, ऊएल

35 बनाया, बेदया, कलूही,

36 वन्या, मरेमोथ, एल्याशीब.

37 मत्तन्या, मत्तनई, व यासू

38 बानी व बिन्नइ, शिमी,

39 शलेम्या, नाथान, अदाया,

40 मखनदबइ, शाशइ, शारइ.

41 अजरएल, शेलेम्या, शमऱ्या

42 शल्लूम, अमऱ्या, योसेफ,

43 नबोच्या वंशातील ईयेल, मत्तिथ्या, जाबाद, जबिना, इद्दो, योएल, बनाया.

44 वरील सर्वांनी परराष्ट्रीय बायकांशी लग्ने केली होती. त्यापैकी काहींना आपल्या बायकांकडून संतती झाली होती.

MAR-IRV

Creative Commons License

Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.

Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.
Lean sinn:



Sanasan