यहेज्केल 15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठीयरूशलेम जणू निरुपयोगी द्राक्षलता 1 नंतर परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला 2 मानवाच्या मुला वनवृक्षाची इतर झाडे त्याच्या फांद्या ह्यांच्या तुलनेत द्राक्षाच्या झाडाची काय श्रेष्ठता आहे? 3 तिचे लाकुड घेऊन काही तरी करण्याच्या उपयोगास पडते काय? किंवा त्यावर काही लटकवण्यासाठी खुंटी म्हणून उपयोगात आणतात काय? 4 बघा जर ती आगीत इंधन म्हणून उपयोगात आणली नाही. तर अग्नीने जाळून भस्म झाल्यावर उपयोगी वस्तू बनवीण्यास कोणत्याच उपयोगात राहत नाही. 5 पाहा ती चांगली असता कोणत्याच उपयोगाची नाही. जळाल्यावरही कोणत्याही कामाची राहणार नाही. 6 प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो की, वनवृक्षातील न आवडते द्राक्षाचे झाड मी आग्नीने जाळून टाकीन त्याच प्रमाणे यरूशलेम निवासी त्यांच्याशी मी तोच व्यवहार करेन. 7 मी माझे मुख त्यांच्या दृष्टीआड करेन, जरी ते आग्नीतून बचावतील तरी अग्नी त्यास भस्म करेल. मी त्यांच्या दृष्टीआड होईल तेव्हा तुम्हास समजेल मी परमेश्वर देव आहे. 8 मी देश ओसाड नापीक करेन कारण ते पापकर्मे करीतात असे प्रभू परमेश्वर देव म्हणतो. |
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.