१ इतिहास 4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठीयहूदाचे वंशज 1 यहूदाच्या मुलांची नावे पेरेस, हेस्रोन, कर्मी, हूर आणि शोबाल. 2 शोबालचा पुत्र राया त्याचा पुत्र यहथ. यहथाचे पुत्र अहूमय आणि लहद. सराथी लोक म्हणजे या दोघांचे वंशज होत. 3 इज्रेल, इश्मा व इद्बाश ही एटामाची पुत्र. त्यांच्या बहिणीचे नाव हस्सलेलपोनी होते. 4 पनुएलाचा पुत्र गदोर आणि एजेरचा पुत्र हूशा ही हूरची पुत्र. हूर हा एफ्राथाचा प्रथम जन्मलेला पुत्र आणि बेथलेहेमाचा बाप होता. 5 अश्शूरचा पुत्र तकोवा. तकोवाला दोन स्त्रिया होत्या. हेला आणि नारा. 6 नाराला अहुज्जाम, हेफेर, तेमनी आणि अहष्टारी हे पुत्र झाले. 7 सेरथ, इसहार, एथ्रान हे हेलाचे पुत्र. 8 हक्कोसाने आनूब आणि सोबेबा यांना जन्म दिला. हारुमचा पुत्र अहरहेल याच्या घराण्यांचे कुळही कोसच होते. 9 याबेस आपल्या भावांपेक्षा फार आदरणीय होता. त्याच्या आईने त्याचे नाव याबेस ठेवले. ती म्हणाली, “कारण याच्यावेळी मला असह्य प्रसववेदना झाल्या.” 10 याबेसाने इस्राएलाच्या देवाची प्रार्थना केली. याबेस म्हणाला, “तू खरोखर मला आशीर्वाद देशील. माझ्या प्रदेशाच्या सीमा वाढविशील. माझ्यावर संकट येऊन मी दुःखीत होऊ नये म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती चांगले होईल.” आणि देवाने त्याची विनंती मान्य केली. 11 शूहाचा भाऊ कलूब. कलूबचा पुत्र महीर. महीरचा पुत्र एष्टोन. 12 बेथ-राफा, पासेहा आणि तहिन्ना ही एष्टोनचे पुत्र. तहिन्नाचा पुत्र ईर-नाहाश. हे रेखा येथील लोक होत. 13 अथनिएल आणि सराया हे कनाजचे पुत्र. हथथ आणि म्योनोथाय हे अथनिएलाचा पुत्र. 14 म्योनोथायने अफ्राला जन्म दिला आणि सरायाने यवाबला जन्म दिला. यवाब हा गे-हराशीम जे कुशल कारागीराचे मूळपुरुष होय. तेथील लोक कुशल कारागीर असल्यामुळे त्यांनी हे नाव घेतले. 15 यफुन्ने याचा पुत्र कालेब. कालेबचे पुत्र म्हणजे इरु, एला आणि नाम. एलाचा पुत्र कनाज. 16 जीफ, जीफा, तीऱ्या आणि असरेल हे यहल्ललेलाचे पुत्र. 17 एज्राचे पुत्र येथेर व मरद, येफेर व यालोन. मेरेदाची मिसरी पत्नीने मिर्याम, शम्माय आणि एष्टमोवाचा पिता इश्बह यांना जन्म दिला. 18 त्याच्या यहूदी पत्नीला गदोराचा पिता येरेद, सोखोचा पिता हेबेर आणि जानोहाचा पिता यकूथीएल हे झाले. हे बिथ्याचे पुत्र होते, फारोची मुलगी बिथ्या जिच्याशी मेरेदाने लग्न केले होते. 19 होदीयाची पत्नी ही नहमाची बहीण होती. हिचे पुत्र गार्मी कईला आणि माकाथी एष्टमोवा यांचे पिता होते. 20 अम्नोन, रिन्ना, बेन-हानान, तिलोन हे शिमोनाचे पुत्र. इशीचे पुत्र जोहेथ आणि बेन-जोहेथ. 21 यहूदाचा पुत्र शेला याच्यापासून लेखाचा पिता एर, मारेशाचा पिता लादा, आणि तलम कापडाचे कसबाचे काम करणारे अश्बेच्या घराण्यातली ही कुळे झाली. 22 तसेच त्याच्यापासून योकीम, कोजेबा येथील लोक योवाश आणि मवाबीवर अधिकार चालवणारे साराफ व याशूबी-लेहेम हे जन्मले. फार जुन्या बातमीतून ही नोंद घेतली आहे. 23 शेलाचे वंशज हे कुंभार असून ते नेताईम आणि गदेरा येथे राजाच्या चाकरीत होते. शिमोनाचे वंशज उत्प. 46:10 24 नमुवेल, यामीन, यरिब, जेरह, शौल हे शिमोनाचे पुत्र. 25 शौलाचा पुत्र शल्लूम. शल्लूमचा पुत्र मिबसाम. मिबसामचा पुत्र मिश्मा. 26 मिश्माचा पुत्र हम्मूएल. हम्मूएलचा पुत्र जक्कूर. जक्कूरचा पुत्र शिमी. 27 शिमीला सोळा मुले आणि सहा मुली होत्या. पण शिमीच्या भावांना फारशी पुत्र बाळे झाली नाहीत. यहूदातील घराण्यांप्रमाणे त्यांचे घराणे वाढले नाही. 28 शिमीच्या वंशजातील लोक बैर-शेबा, मोलादा व हसर-शुवाल. 29 बिल्हा, असेम, तोलाद, 30 बथुवेल, हर्मा सिकलाग, 31 बेथ-मर्का-बोथ, हसर-सुसीम, बेथ-बिरी व शाराइम येथे राहत होते. दावीदाच्या कारकीर्दीपर्यंत ही त्यांची नगरे होती. 32 त्यांचे गांव एटाम, अईन, रिम्मोन, तोखेन आणि आशान अशी या पाच नगरांची नावे. 33 बालापर्यंत त्याच नगरांच्या आसपासच्या खेड्यापाड्यांमधूनही ते राहत होते. आपल्या वंशावळींची नोंदही त्यांनीच ठेवली. 34 त्यांच्या घराण्यातील वडिलाची नांवे मेशोबाब, यम्लेक, अमस्याचा पुत्र योशा, 35 योएल, येहू हा योशिब्याचा पुत्र, सरायाचा पुत्र योशिब्या, असिएलचा पुत्र सराया, 36 एल्योवेनाय, याकोबा, यशोहाया, असाया, अदीएल, यशीमिएल, बनाया, 37 जीजा हा शिफीचा पुत्र. शिफी हा अल्लोनचा पुत्र, अल्लोन यदायाचा पुत्र, यदाया शिम्रीचा पुत्र, आणि शिम्री शमायाचा पुत्र. 38 ज्यांची नावे येथे दाखल केली आहेत ते सर्व आपआपल्या कुळांचे प्रमुख होते. त्यांच्या घराण्याची झपाटयाने वाढ झाली. 39 ते खोऱ्याच्या पूर्वेला गदोरच्या सीमेबाहेरही जाऊन पोहोंचले. आपल्या कळपांना चरायला गायराने हवे म्हणून जमिनीच्या शोधात ते गेले. 40 त्यांना विपुल व चांगली गायराने मिळाली. तो देश मोठा असून शांत व स्वस्थ होता. हामाचे वंशज पूर्वी या भागात राहत असत. 41 हिज्कीया यहूदाचा राजा होता त्यावेळची ते लोक गदोरपर्यंत आले आणि हामच्या लोकांशी त्यांनी लढाई केली. हामच्या लोकांच्या राहुट्या त्यांनी उद्ध्वस्त केल्या. तेथे राहणाऱ्या मूनी लोकांसही त्यांनी ठार केले. आजही या भागात मूनी नावाचे लोक आढळत नाहीत. तेव्हा या लोकांनी तेथे वस्ती केली. मेंढरांसाठी गायराने असल्याने ते तेथे राहिले. 42 शिमोनाच्या घराण्यातील पाचशे माणसे सेईर डोंगरावर त्याच्या नेत्याबरोबर गेली. इशीचे पुत्र पलट्या, निरह्या, रफाया आणि उज्जियेल हे होते. 43 काही अमालेकी लोकांचा त्यातूनही निभाव लागला ते तेवढे अजून आहेत. त्यांना शिमोन्यांनी ठार केले. तेव्हापासून सेईरमध्ये अजूनही शिमोनी लोक राहत आहेत. |
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.