Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

१ इतिहास 1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी


आदामाचे वंशज
उत्प. 5:1-32 ; 10:1-32 ; 11:10-26 ; लूक 3:34-38

1 आदाम, शेथ, अनोश,

2 केनान, महललेल, यारेद,

3 हनोख, मथुशलह, लामेख,

4 नोहा, शेम, हाम आणि याफेथ.


नोहाच्या मुलांचे वंशज

5 याफेथाचे पुत्रः गोमर, मागोग, माद्य, यावान, तुबाल, मेशेख, तीरास

6 गोमरचे पुत्र आष्कनाज, रीफाथ, तोगार्मा

7 यावानाचे पुत्र अलीशा, तार्शीश, कित्तीम, दोदानीम.

8 हामाचे पुत्र कूश, मिस्राईम, पूट व कनान.

9 कूशचे पुत्र सबा, हवीला, सब्ता, रामा, साब्तका, रामाचे पुत्र शबा आणि ददान.

10 कूशाने निम्रोदाला जन्म दिला, जो पृथ्वीवरचा पहिला जगजेत्ता बनला.

11 मिस्राईमने लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम

12 पात्रुसीम, कास्लूहीम (ज्यांच्यापासून पलिष्टी झाले) व कफतोरीम यांना जन्म दिला.

13 आणि कनानाचा ज्येष्ठ पुत्र सीदोन व त्यानंतर हेथ,

14 यबूसी, अमोरी, गिर्गाशी,

15 हिव्वी, आर्की, शीनी

16 अर्वादी, समारी, हमाथी हे होत.

17 एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद आणि अराम, ऊस, हूल, गेतेर आणि मेशेख हे शेमचे पुत्र.

18 शेलहचा पिता अर्पक्षद आणि एबरचे पिता शेलह.

19 एबरला दोन पुत्र झाले. एकाचे नाव पेलेग होते, कारण त्याच्या दिवसात पृथ्वीची विभागणी झाली. पेलेगच्या बंधूचे नाव यक्तान.

20 यक्तानने अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह,

21 हदोराम, ऊजाल, दिक्ला,

22 एबाल, अबीमाएल, शबा,

23 ओफीर, हवीला, योबाब यांना जन्म दिला. हे सर्व यक्तानाचे पुत्र होते.


शेमाचे वंशज

24 शेम, अर्पक्षद, शेलह,

25 एबर, पेलेग, रऊ

26 सरुग, नाहोर, तेरह,

27 अब्राम म्हणजेच अब्राहाम.


इश्माएलाचे वंशज
उत्प. 25:12-16

28 इसहाक आणि इश्माएल ही अब्राहामचे पुत्र.

29 ही त्यांची नावे, इश्माएलचा प्रथम जन्मलेला नबायोथ मग केदार, अदबील, मिबसाम,

30 मिश्मा, दुमा, मस्सा, हदद, तेमा

31 यतूर, नापीश, केदमा. हे सर्व इश्माएलाचे पुत्र.

32 अब्राहामाची उपपत्नी कटूरा हिचे पुत्र जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक, शूह यांना जन्म दिला. यक्षानला शबा व ददान हे पुत्र झाले.

33 एफा, एफर, हनोख, अबीदा, एल्दा हे मिद्यानचे पुत्र. या सर्वांना कटूराने जन्म दिला.


एसावाचे वंशज
उत्प. 36:10-14

34 इसहाक हा अब्राहामाचा पुत्र. एसाव आणि इस्राएल हे इसहाकाचे पुत्र.

35 एसावाचे पुत्र अलीपाज, रगुवेल, यऊश, यालाम, कोरह.

36 अलीपाजचे पुत्र तेमान, ओमार, सपी, गाताम, कनाज. याखेरीज अलीपाज आणि तिम्ना यांना अमालेक नावाचा पुत्र होता.

37 नहाथ, जेरह, शम्मा, मिज्जा हे रगुवेलाचे पुत्र होत.

38 लोटान, शोबाल, सिबोन, अना, दीशोन, एसर व दीशान हे सेईराचे पुत्र.

39 होरी आणि होमाम हे लोटानाचे पुत्र. लोटानाला तिम्ना नावाची बहीणही होती.

40 आल्यान, मानहाथ, एबाल, शपी आणि ओनाम हे शोबालचे पुत्र. अय्या आणि अना हे सिबोनचे पुत्र.

41 दिशोन हा अनाचा पुत्र आणि हम्रान, एश्बान, यित्राण, करान हे दीशोनाचे पुत्र.

42 बिल्हान, जावान, याकान हे एसेराचे पुत्र. ऊस व अरान हे दीशानाचे पुत्र.

43 इस्राएलामध्ये या राजांनी राज्य केले त्याच्या कितीतरी आधी अदोम येथे हे राजे होते. त्यांची नावे बौराचा पुत्र बेला, बेलाच्या नगराचे नाव दीन्हाबा.

44 बेलाच्या निधनानंतर जेरहचा पुत्र योबाब राजा झाला. योबाब बस्रा येथील होता.

45 योबाबाच्या निधनानंतर त्याच्या जागी हूशाम राजा झाला. हा तेमानी देशातील होता.

46 हूशामच्या मृत्यूनंतर बदादचा पुत्र हदाद याने राज्य केले. त्याने मवाबाच्या देशात मिद्यानचा पराभव केला. हदादच्या नगराचे नाव अवीत होते.

47 हदाद मरण पावल्यावर साम्ला राजा झाला. हा मास्रेका येथील होता.

48 साम्ला मरण पावल्यावर त्याच्या जागी शौल राज्यावर आला. हा नदीवरल्या रहोबोथाचा होता.

49 शौल मरण पावल्यावर अकबोराचा पुत्र बाल-हानान राजा झाला.

50 बाल-हानान मरण पावल्यावर हदाद राजा झाला. त्याच्या मुख्य नगराचे नाव पाई असे होते. हदादच्या पत्नीचे नाव महेटाबेल. ही मात्रेद हिची कन्या. मात्रेद मेजाहाबची कन्या.

51 पुढे हदाद मरण पावल्यानंतर अदोमाचे सरदार तिम्ना, आल्वा, यतेथ,

52 अहलीबामा, एला, पीनोन,

53 कनाज, तेमान मिब्सार,

54 माग्दीएल, ईराम, हे अदोमाचे नेते झाले.

MAR-IRV

Creative Commons License

Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.

Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.
Lean sinn:



Sanasan