रोमकरांस 2:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 ज्यांच्या शरीराची सुंता झालेली नसून नियम पाळतात ते तुम्हाला दोषी ठरवतील, कारण तुमच्याजवळ लेखी नियम आहेत आणि सुंता झालेली असतानाही तुम्ही नियम तोडता. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 आणि तुला शास्त्रलेख असूनही व तुझी सुंता होऊनही जो तू नियमशास्त्राचे उल्लंघन करणारा आहेस त्या तुझा न्याय, जो शारीरिक सुंता न झालेल्यांपैकी असून नियमशास्त्र पाळतो, तो करील. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 आणि देहाने सुंता न झालेला कोणी जर नियमशास्त्राचे पालन करीत असेल, तर ज्या तुला शास्त्रलेख व सुंताविधी मिळाले असूनही तू नियमशास्त्राचे उल्लंघन करतोस त्या तुझा तो न्याय करणार नाही काय? See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 आणि तुझ्याकडे धर्मशास्त्रलेख असूनही व तुझी सुंता होऊनही जो तू नियमशास्त्राचे उ्रंघन करणारा आहेस त्या तुझा न्याय, जो शारीरिक सुंता न झालेल्यांपैकी असून नियमशास्त्र पाळतो, तो करील. See the chapter |