प्रकटी 2:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24-25 थुवतीरा येथील बाकीचे जे तुम्ही तिच्या शिकवणीप्रमाणे चालत नाहीत व सैतानाच्या गहन गोष्टी शिकला नाहीत, मी तुम्हाला सांगतो, की मी तुमच्यावर अधिक ओझे लादणार नाही, फक्त मी येईपर्यंत तुमच्याजवळ जे आहे ते दृढ धरून राहा. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 थुवतीरा येथील बाकीचे जे तुम्ही तिच्या शिकवणीप्रमाणे चालत नाही, ज्यांना सैतानाच्या गहन म्हटलेल्या गोष्टी माहीत नाहीत त्या तुम्हांला मी सांगतो की, मी तुमच्यावर दुसरा भार लादणार नाही; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 पण थुवतीरा येथील मंडळीतील जे दुसरे लोक आहेत जे तिची शिकवण आचरीत नाहीत त्यांना मी सांगतो की ज्यास सैतानाच्या खोल गोष्टी असे म्हणतात, त्या गोष्टी ज्यांना माहित नाहीत, त्या तुमच्यावर मी दुसरे ओझे लादणार नाही. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 थुवतीरा येथील बाकीचे जे तुम्ही तिच्या शिकवणीप्रमाणे चालत नाही, तुम्हांला सैतानाच्या तथाकथित गहन गोष्टी माहीत नाहीत. मी तुम्हांला सांगतो की, मी तुमच्यावर दुसरा भार लादणार नाही. See the chapter |