Biblia Todo Logo
Online Bible

- Advertisements -




फिलिप्पैकरांस 4:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 शेवटी, बंधू आणि भगिनींनो, जे काही सत्य, जे काही आदरणीय व जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही सुंदर, जे काही प्रशंसनीय, श्रवणीय आणि स्तुतिपात्र आहे त्याचा विचार करा.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, जे काही आदर णीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्‍गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही खरे आहे, जे काही आदरणीय आहे, जे काही न्याय्य आहे, जे काही शुद्ध आहे, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यावर विचार करा.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, आदरणीय, न्याय्य, शुद्ध, आनंददायक म्हणजेच जे उत्कृष्ट व शिफारसयोग्य आहे अशा गोष्टींचे मनन करा.

See the chapter Copy




फिलिप्पैकरांस 4:8
67 Cross References  

कारण मी त्याला निवडले आहे अशासाठी की त्याने त्याच्यानंतर त्याच्या लेकरांना व त्याच्या घराण्याला याहवेहच्या मार्गात जे योग्य व न्यायी आहे, त्यात चालवावे, त्यामुळे अब्राहामाला दिलेले अभिवचन याहवेह पूर्ण करतील.”


शौल आणि योनाथान, जिवंत असता प्रिय व आवडते होते, मृत्यूमध्येही त्यांचा वियोग झाला नाही. ते गरुडांपेक्षा वेगवान होते, सिंहांपेक्षा बलवान असे होते.


इस्राएलचे परमेश्वर बोलले, इस्राएलच्या खडकाने मला म्हटले: ‘जेव्हा एखादा मनुष्य न्यायाने लोकांवर राज्य करतो, जेव्हा तो परमेश्वराचे भय बाळगून राज्य करतो,


तुम्ही कुठवर दुष्टांचे समर्थन करणार, अन्यायी लोकांसाठी पक्षपात करत राहणार? सेला


खोट्या तराजूंचा याहवेह तिरस्कार करतात, परंतु अचूक वजनांमुळे त्यांना संतोष होतो.


सद्गुणी स्त्री ही आपल्या पतीला मुकुटासारखी आहे, परंतु लज्जास्पद आचरणाची स्त्री त्याच्या हाडातील कुजकेपणासारखी आहे.


प्रामाणिकपणाची मापे आणि तराजू याहवेहची आहेत पिशवीतील सर्व वजने त्यांनीच तयार केली आहेत.


नीतिमान मनुष्य निष्कलंकीतपणे चालतो; त्याच्यामागे त्याच्या मुलाबाळांना आशीर्वाद प्राप्त होतात.


सद्गुणी पत्नी कोणाला मिळेल? तर तिचे मोल माणकाहूनही अधिक आहे.


“उत्कृष्ट कार्य करणार्‍या अनेक स्त्रिया आहेत, पण त्या सर्वात तू उत्तम आहेस.”


तिने केलेल्या सर्व कृत्यांसाठी तिचा सन्मान कर, आणि तिच्या कार्याबद्दल शहराच्या वेशीजवळ तिची प्रशंसा केली जावो.


त्याचे मुख परममधुर आहे; तो सर्वस्वी सुंदर आहे. यरुशलेमच्या कन्यांनो, हाच माझा प्रियकर, हाच माझा मित्र आहे.


नीतिमानाचा मार्ग समतल असतो; तुम्ही जे परमनीतिमान आहात, नीतिमानांचा मार्ग सुकर करा.


त्यानुसार परूश्यांनी आपल्या काही शिष्यांना हेरोदी गटाच्या लोकांबरोबर येशूंकडे पाठविले व म्हणाले, “गुरुजी, तुम्ही प्रामाणिक व्यक्ती आहात, हे आम्हाला माहीत आहे. तुम्ही कोणाचे समर्थन करीत नाही, कोणाची पर्वा न करता खरेपणाने परमेश्वराचा मार्ग शिकविता आणि भेदभाव न करता, ते कोण आहेत याकडे लक्ष देत नाहीत.


कारण हेरोद योहानाला भीत असे आणि तो नीतिमान व पवित्र मनुष्य आहे म्हणून त्याचे संरक्षण करत असे. हेरोद योहानाचे बोलणे ऐकून गोंधळात पडत असे; तरी त्याचे ऐकून घ्यावयास त्याला आवडे असे.


येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही स्वतःस दुसर्‍यांच्या दृष्टीने नीतिमान ठरविणारे आहात, परंतु परमेश्वर तुमचे हृदय जाणून आहे. लोक ज्याला महत्त्व देतात त्या गोष्टी परमेश्वराच्या दृष्टीने तुच्छ आहेत.


यरुशलेम येथे शिमोन नावाचा एक मनुष्य होता, तो नीतिमान आणि भक्तिमान होता व इस्राएलाच्या सांत्वनाची वाट पाहत असून पवित्र आत्मा त्याजवर होता.


यहूदीयातील अरिमथिया शहराचा योसेफ नावाचा एक मनुष्य होता, तो न्यायसभेचा सदस्य असून चांगला व नीतिमान होता.


जो कोणी स्वतःचे विचार मांडतो तो स्वतःचे गौरव करतो, परंतु जो ज्याने त्याला पाठविले त्याला गौरव मिळावे म्हणून बोलतो, तो मनुष्य खरा आहे; व त्याच्यात खोटेपण नाही.


त्या माणसांनी उत्तर दिले, “आम्ही कर्नेल्य शताधिपतीकडून आलो आहोत. ते नीतिमान आणि परमेश्वराला भिऊन वागणारे मनुष्य आहेत, सर्व यहूदी लोकांकडून सन्मानित झालेले आहेत. एका पवित्र दूताने त्यांना सांगितले की तुम्ही पेत्राला तुमच्या घरी बोलवावे म्हणजे तुमच्याकडील संदेश त्यांना ऐकता येईल”


“हनन्याह नावाचा मनुष्य मला भेटावयास आला. तो नियमशास्त्राचे अचूक पालन करणारा होता व सर्व यहूदी लोकांचे त्याच्याबद्दल फारच चांगले मत होते.


तर बंधूंनो आणि भगिनींनो, तुमच्यामधून जे आत्म्याने परिपूर्ण आणि सुज्ञ आहेत अशा सात माणसांची निवड करा म्हणजे आम्ही त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवून देऊ.


दिवस आहे तोपर्यंत आपली वागणूक सभ्य असू द्या. दंगलीत, मद्याच्या धुंदीत, लैंगिक अनैतिकतेत, कामासक्तीत, कलहात व मत्सरात आपला वेळ व्यर्थ दवडू नका.


जे योग्य गोष्टी करतात, त्यांना राज्यकर्त्यांची भीती वाटत नाही, परंतु जे अयोग्य करतात त्यांनाच त्याची भीती वाटते. जे अधिकारी आहेत त्यांच्या भयापासून मुक्त असावे, अशी तुमची इच्छा आहे काय? तर मग योग्य तेच करा, म्हणजे तो तुमची प्रशंसा करेल.


कारण जो अशाप्रकारे ख्रिस्ताची सेवा करतो तो परमेश्वराला संतोष देणारा व मनुष्यांनी पारखलेला आहे.


तोच खरा यहूदी, जो मनाने यहूदी आहे आणि सुंता ही अंतःकरणाची सुंता आहे व ती आत्म्याद्वारे आहे, लेखी व्यवस्थेप्रमाणे नाही. अशा व्यक्तीची प्रशंसा इतर लोकांकडून नव्हे, तर परमेश्वरापासून होईल.


यास्तव निवडलेल्या समयापूर्वी व प्रभूच्या आगमनापूर्वी कशाचाही न्याय करू नका. त्यावेळी ते अंधकारात लपलेले सत्य प्रकाशात आणतील व आपल्या अंतःकरणातील उद्देश उघड करेल आणि मग त्यावेळी प्रत्येकाला परमेश्वराकडून प्रशंसा मिळेल.


आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो की तुम्ही जे अयोग्य आहे ते करू नये केवळ आम्ही परीक्षेत उतरलो आहोत म्हणून नव्हे आणि जरी आम्ही उतरलो नाही असे दिसले तरी तुम्ही योग्य जे आहे ते करावे.


गौरव आणि अपमान, वाईट अहवाल आणि चांगला अहवाल; प्रामाणिक परंतु लबाड समजण्यात आलेले;


शुभवार्तेच्या सेवेसाठी ज्याची प्रशंसा सर्व मंडळ्यातून होत आहे अशा एका बंधूला त्याच्याबरोबर पाठवित आहे.


फक्त प्रभूंच्या दृष्टिकोनातून नव्हे तर मानवाच्या दृष्टिकोनातूनही जे योग्य आहे ते करण्याकरिता आम्ही श्रम घेतो.


परंतु आत्म्याचे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वासूपणा,


यास्तव तुम्ही प्रत्येकजण एकमेकांशी लबाडी करण्याचे सोडून, आपल्या शेजार्‍यांशी सत्य बोला, कारण आपण सर्व एकाच शरीराचे अवयव आहोत.


(प्रकाशाचे फळ सर्वप्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व व सत्यता यामध्ये आहे.)


म्हणून सत्यरूपी कमरबंदाने आपली कंबर बांधा, नीतिमत्वाचे ऊरस्त्राण घेऊन स्थिर उभे राहा.


न्याय आणि केवळ न्यायाचीच कास तुम्ही धरावी, जेणेकरून याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या देशाचा ताबा घेऊन तुम्ही तिथे वस्ती करू शकाल.


बंधू व भगिनींनो, प्रभूमध्ये आनंद करा. त्याच गोष्टी तुम्हाला पुन्हा लिहिण्याचा मला त्रास होत नाही आणि हे तुमच्या संरक्षणासाठी आहे.


बाहेरील लोकांबरोबर सुज्ञतेने वागा; आणि प्रत्येक संधीचा उपयोग करून घ्या.


म्हणजे तुमचे दैनंदिन जीवन बाहेरील लोकांच्या सन्मानास पात्र ठरेल आणि तुम्हाला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.


अशाच प्रकारे राजांसाठी आणि अधिकार्‍यांसाठी करावी, यासाठी की आपण पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने शांतीचे व स्वस्थपणाचे आयुष्यक्रमण करावे.


त्याचप्रमाणे, त्यांच्या पत्नीदेखील आदरणीय असाव्यात. त्या निंदानालस्ती करणार्‍या असू नयेत, तर त्या नेमस्त व सर्व गोष्टींविषयी विश्वासू असाव्यात.


तो आपल्या घरावर उत्तम अधिकार चालविणारा, त्याने आपल्या लेकरांना आज्ञाधारक ठेवावे आणि हे सर्व आदरयुक्तरितीने करावे.


कोणालाही तुझे तरुणपण तुच्छ लेखू देऊ नकोस. तर तू विश्वासणार्‍यांसाठी बोलण्यात, वर्तणुकीत, प्रीतीत, विश्वासात, शुद्धपणात कित्ता हो.


जिच्या चांगल्या कामाबद्दल ती प्रसिद्ध आहे, म्हणजे जिने आपल्या मुलाबाळांचे चांगले संगोपन केले असेल, जिने आतिथी सत्कार केलेला असेल, जिने प्रभूच्या लोकांचे पाय धुतले असतील, संकटात पडलेल्या लोकांना मदत केली असेल आणि सर्वप्रकारच्या चांगल्या कामासाठी समर्पित केले असेल, तिचे नाव विधवांच्या यादीत लिहावे.


वयस्कर स्त्रियांना मातेसमान वागणूक दे आणि तरूणींविषयी केवळ शुद्ध भावना बाळगून त्यांना बहिणींसमान वागणूक दे.


ते पाहुणचार करण्याची आवड असणारे, चांगल्या गोष्टींवर प्रेम करणारे, इंद्रियदमन करणारे, सरळ, पवित्र आणि शिस्तबद्ध असावे.


त्यांनीच स्वतःचे बलिदान देऊन आपल्याला प्रत्येक अधर्मापासून मुक्त केले, त्यांनी स्वतःसाठी शुद्ध करून त्यांच्या चांगल्या कार्यासाठी आपल्याला उत्साही प्रजा बनविले.


वयस्क पुरुषांनी नेमस्त, आदरास पात्र, आत्मसंयमी व विश्वास, प्रीती आणि सहनशीलता यामध्ये खंबीर असावे, असे शिक्षण तू त्यांना दे.


जे चांगले ते करून, तू त्यांना प्रत्येक गोष्टींत कित्ता घालून दे. तुझ्या शिकविण्यात प्रामाणिकपणा, गांभीर्य दाखव.


कारण गरजवंतांना मदत करण्यास आपल्या लोकांनी शिकले पाहिजे, म्हणजे ते आपल्या दररोजच्या गरजा भागवू शकतील व निष्फळ जीवन जगणार नाही.


पुरातन काळातील परमेश्वराचे भक्त त्यांच्या विश्वासाबद्दल नावाजलेले होते.


आमच्यासाठी प्रार्थना करा. कारण आमची खात्री आहे की आमची विवेकबुद्धी स्वच्छ आहे व सर्व बाबतीत सन्मानाने जगण्याची आमची इच्छा आहे.


परमेश्वर पित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्दोष भक्ती हीच आहे की अनाथ व विधवांची त्यांच्या दुःखात काळजी घेणे आणि जगाच्या मलिनतेपासून स्वतःला अलिप्त राखणे.


परंतु स्वर्गातून येणारे ज्ञान हे सर्वप्रथम शुद्ध, नंतर शांतिप्रिय, विचारशील, विनयी, दयामयी व चांगली फळे यांनी भरलेले, अपक्षपाती आणि प्रामाणिक असते.


आता सत्याचे आज्ञापालन करून तुम्ही स्वतःला शुद्ध केले आहे यासाठी की, तुमची एकमेकांवर खरी प्रीती असावी आणि एकमेकांवर खोल अंतःकरणापासून प्रीती करावी.


अनीतिमान लोकांमध्ये अशा प्रकारचे चांगले जीवन जगा, की अयोग्य कृत्ये करण्याचा ते तुमच्यावर आरोप करीत असतील, तरी ते तुमची चांगली कामे पाहतील आणि परमेश्वराच्या येण्याच्या दिवशी ते त्यांचे गौरव करतील.


सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकमेकांवर निष्ठेने प्रीती करा, कारण प्रीती पुष्कळ पापांची रास झाकून टाकते.


प्रिय मित्रांनो, आता माझे हे तुम्हाला दुसरे पत्र आहे. या दोन्ही पत्राद्वारे मी तुम्हाला आठवण देऊन तुमच्या विचारांना हितकारक होतील अशा गोष्टींना चालना देत आहे.


प्रिय लेकरांनो, आपण शब्दांनी किंवा कोरड्या बोलण्याने प्रीती करू नये, परंतु कृतीने आणि सत्याने प्रीती करावी.


ज्यांना त्यांच्यामध्ये अशी आशा आहे ते स्वतःला शुद्ध करतात, जसे ते शुद्ध आहेत.


प्रिय मित्रांनो, प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका, परंतु ते आत्मे परमेश्वराकडून आलेले आहेत का याची परीक्षा करा, कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगामध्ये निघालेले आहेत.


आणि आता, माझ्या मुली, घाबरू नकोस. तू जे काही मागशील ते मी सर्व तुझ्यासाठी करेन. माझ्या नगरातील सर्व लोकांना माहीत आहे की, तू एक नीतिमान चरित्र असलेली स्त्री आहेस.


Follow us:

Advertisements


Advertisements