Biblia Todo Logo
Online Bible

- Advertisements -




फिलिप्पैकरांस 4:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 मला गरज आहे म्हणून मी हे बोलतो असे नाही, कारण कोणत्याही परिस्थितीत समाधानी राहण्यास मी शिकलो आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 मला काही कमी पडल्यामुळे मी बोलतो असे नाही; कारण ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वावलंबी राहण्यास शिकलो आहे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मला काही कमी पडल्यामुळे मी बोलत आहे असे नाही, कारण मी असेन त्या स्थितीत संतुष्ट राहण्यास शिकलो आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 मला काही कमी पडल्यामुळे मी बोलतो असे नाही. ज्या स्थितीत मी आहे, त्या स्थितीत मी समाधानी राहण्यास शिकलो आहे.

See the chapter Copy




फिलिप्पैकरांस 4:11
13 Cross References  

नंतर याकोबाने नवस केला, “जर परमेश्वर माझ्यासोबत असतील, या प्रवासात माझे रक्षण करतील, मला अन्नपाणी, वस्त्र देतील,


मोशेने त्या मनुष्यासह राहण्यास स्वीकारले. त्याने आपली मुलगी सिप्पोराह हिला मोशेची पत्नी म्हणून दिली.


काही शिपायांनी विचारले, “आम्ही काय करावे?” योहानाने उत्तर दिले. “धमक्या देऊन किंवा खोटे आरोप रचून पैसा उकळू नका आणि आपल्या वेतनात संतुष्ट राहा.”


मी श्रम व कष्ट केले आणि अनेकदा झोपेशिवाय राहिलो आहे. अनेक वेळा मी उपाशी व तान्हेला होतो; पुष्कळदा भोजनाशिवाय राहिलो आहे; मी थंडीने कुडकुडलो व नग्न होतो.


व्यथित परंतु सतत आनंदित; गरीब परंतु इतरांना धनवान बनविणारे; मालकीचे काहीही नाही आणि तरी सर्वकाही असल्यासारखे असे आहोत.


आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे, जरी ते इतके धनवान होते तरी तुमच्यासाठी दरिद्री झाले, यासाठी की त्यांच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे.


परमेश्वर तुम्हाला विपुल आशीर्वाद देण्यास समर्थ आहे. ते तुम्हाला सर्ववेळी व सर्व गोष्टीत एवढे देतील की जे काही तुम्हाला गरजेचे आहे ते मिळेल व चांगल्या कामासाठी भरपूर शिल्लक राहील.


यापेक्षाही अधिक, ख्रिस्त येशू माझे प्रभू, यांच्या सर्वश्रेष्ठ ज्ञानासाठी मी सर्वकाही हानी असे समजतो व त्यासाठी मी सर्वगोष्टी गमावल्या आहेत व मी त्या कचर्‍यासमान लेखतो यासाठी की ख्रिस्त मला प्राप्त व्हावे.


बंदिवानांबरोबर तुम्ही दुःख सोसले आणि अधिक चांगली व टिकाऊ मालमत्ता आपल्याजवळ आहे हे समजून तुम्ही स्वतःच्या मालमत्तेची जप्ती आनंदाने स्वीकारली.


Follow us:

Advertisements


Advertisements