Biblia Todo Logo
Online Bible

- Advertisements -




फिलिप्पैकरांस 3:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 मी आठव्या दिवशी सुंता झालेला, इस्राएली लोकातील, बन्यामीन वंशातील, इब्र्यांचा इब्री; नियमशास्त्रानुसार परूशी असा होतो;

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 मी तर आठव्या दिवशी सुंता झालेला, इस्राएल लोकांतला, बन्यामीन वंशातला, इब्र्यांचा इब्री; नियमशास्त्रदृष्टीने परूशी;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 मी तर आठव्या दिवशी सुंता झालेला, इस्राएल लोकातला, बन्यामीन वंशातला, इब्य्रांचा इब्री, नियमशास्त्रदृष्टीने परूशी;

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 मी तर आठव्या दिवशी सुंता झालेला, इस्राएली लोकांतल्या बन्यामीन वंशातला, शुद्ध हिब्रू रक्ताचा व नियमशास्त्रानुसार परुशी आहे.

See the chapter Copy




फिलिप्पैकरांस 3:5
16 Cross References  

या लढाईत वाचलेला एक मनुष्य इब्री अब्रामाकडे पळून आला व त्याने ही बातमी त्याला सांगितली. त्यावेळी अब्राम, अमोरी मम्रे याच्या एला राईत तळ देऊन राहिला होता. अष्कोल व आनेर हे दोघे मम्रेचे भाऊ होते व त्यांनी अब्रामासोबत करार केला होता.


पुत्र जन्मल्यानंतर आठव्या दिवशी त्याची सुंता केली पाहिजे. सुंतेची ही अट तू पैसे देऊन विकत घेतलेल्या परदेशीय गुलामांना आणि तुझ्या घराण्यात जन्मलेल्या प्रत्येकाला, जी तुझी संतती नाही त्यांनाही लागू आहे.


कारण मला इब्री लोकांच्या देशातून येथे पळवून आणण्यात आले आणि अंधारकोठडीची शिक्षा मला मिळावी, असे मी काही केले नाही.”


त्या ठिकाणी एक इब्री तरुण होता; तो सुरक्षादलाच्या अधिकार्‍याचा गुलाम होता. त्याला आम्ही आमची स्वप्ने सांगितली आणि त्याने आम्हाला आमच्या स्वप्नांचा अर्थ सांगितला, त्याने प्रत्येकाच्या स्वप्नानुसार त्याच्या अर्थ सांगितला.


योनाहने त्यांना उत्तर दिले, “मी एक इब्री आहे आणि मी स्वर्गातील याहवेह परमेश्वराची उपासना करतो, ज्यांनी समुद्र आणि कोरडी जमीन निर्माण केली.”


मग आठव्या दिवशी जे बाळाची सुंता करण्यासाठी आले, ते त्याच्या वडिलांचे जखर्‍याह हेच नाव त्याला देणार होते,


आठव्या दिवशी, बालकाची सुंता करण्याची वेळ आली, त्यावेळी त्यांचे नाव येशू ठेवण्यात आले, हे नाव त्यांना त्यांची गर्भधारणा होण्यापूर्वीच देवदूताने दिले होते.


तसे होऊ नये, म्हणून नवा द्राक्षारस नवीन बुधल्यांमध्ये ओततात.


“मी एक यहूदी आहे आणि माझा जन्म किलिकियामधील तार्सस शहरात झाला, परंतु मी या शहरात वाढलो. माझे शिक्षण गमालियेलच्या मार्गदर्शनात झाले व आपल्या पूर्वजांच्या नियमशास्त्राचे सविस्तर प्रशिक्षण मला मिळाले. जसे तुम्ही आज परमेश्वराविषयी आवेशी आहात तसाच मीही होतो.


नंतर पौलाला, समजले की तिथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये काही सदूकी आहेत आणि इतर परूशी आहेत, तेव्हा पौल न्यायसभेच्या समोर म्हणाला, “बंधूंनो, माझे पूर्वज परूशी होते, त्यांच्याप्रमाणे मी परूशी आहे आणि माझी आशा व मृतांचे पुनरुत्थान यामुळे माझी चौकशी होत आहे.”


त्या दिवसांमध्ये शिष्यांची संख्या वाढत असताना, त्यांच्यापैकी काही ग्रीक भाषिक यहूदी लोकांनी इब्री भाषिक यहूदी लोकांविरुद्ध तक्रार केली की दररोजच्या भोजनाचे वाटप होत असताना त्यांच्या विधवांकडे दुर्लक्ष होत आहे.


मग मी विचारतो: परमेश्वराने आपल्या लोकांचा त्याग केला आहे काय? मुळीच नाही! मी स्वतः एक इस्राएली, अब्राहामाच्या कुळातील व बन्यामीनाच्या वंशातील आहे.


ते इब्री आहेत का? तर मी पण आहे. ते इस्राएली आहेत का? मग मी देखील आहे. ते अब्राहामाचे संतान आहेत ना? मग, मी देखील आहे.


तो मोठा जयघोष ऐकून पलिष्ट्यांनी विचारले “इब्री लोकांच्या छावणीमध्ये हा कसला जयघोष होत आहे?” जेव्हा त्यांना कळले की, याहवेहचा कोश छावणीमध्ये आला आहे,


Follow us:

Advertisements


Advertisements