Biblia Todo Logo
Online Bible

- Advertisements -




फिलिप्पैकरांस 3:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 त्यांचा शेवट तर विनाश आहे, कारण पोट हेच त्यांचे दैवत आहे; निर्लज्जपणा त्यांचे गौरव आहे आणि त्यांचे मन भौतिक गोष्टींकडे लागलेले आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत, आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे; त्यांचे चित्त ऐहिक गोष्टींत असते.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत, त्यांचा निर्लज्जपणा हे त्यांचे भुषण आहे, ते जगिक गोष्टींवर चित्त ठेवतात.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 पोट हे त्यांचे दैवत असल्यामुळे नाश हा त्यांचा शेवट आहे. निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे. त्यांचे चित्त केवळ ऐहिक गोष्टींवर असते.

See the chapter Copy




फिलिप्पैकरांस 3:19
52 Cross References  

याहवेह, तुमच्या हातांनी अशा लोकांपासून मला वाचवा, ज्यांना याच जीवनात प्रतिफळ आहे. जी शिक्षा तुम्ही दुष्टांसाठी साठवून ठेवलेली आहे त्यानेच त्यांचे पोट भरो, त्यांची संततीही तेच आधाशीपणे खाओ, आणि त्यांचे उरलेले पुढच्या संततीलाही मिळो.


हे बलवान पुरुषा, दुष्ट कृत्यांची बढाई का मारतोस, तू दिवसभर कशाचा अभिमान बाळगतोस, तू जो परमेश्वराच्या दृष्टीने निंदनीय आहेस?


आम्ही जे करणार असे म्हटले होते, तसे आम्ही निश्चितच करू. आम्ही आकाशराणीस धूप जाळू आणि तिला पेयार्पण करू, जसे आम्ही व आमच्या पूर्वजांनी, आणि आमचे राजे व अधिपती यांनी यहूदीयाच्या नगरात, यरुशलेमच्या रस्त्यात नेहमी केले, तसेच आम्हीही करू. कारण त्या दिवसात आमच्याकडे विपुल अन्न होते आणि आम्ही सुखात होतो व आम्हाला काहीही इजा झाली नाही.


तुम्ही मूठभर जवासाठी आणि भाकरीच्या तुकड्यांसाठी माझ्या लोकांमध्ये मला अपवित्र केले आहे. जे माझे लोक लबाड्या ऐकतात, त्यांच्याशी तुम्ही खोटे बोलला आहात, ज्यांनी मरू नये अशांना तुम्ही मारून टाकले आणि ज्यांनी जगू नये अशांना तुम्ही वाचविले आहे.


तुम्ही दही खाता, उत्तम मेंढरे कापून तुम्ही आपल्यावर लोकर पांघरता, परंतु तुम्ही आपल्या कळपाची काळजी घेत नाही.


जितकी याजकांची संख्या वाढत गेली, तितकी अधिक पापे त्यांनी माझ्याविरुद्ध केली; त्यांच्या वैभवशाली परमेश्वराच्या बदल्यात त्यांनी लाजिरवाणी गोष्ट स्वीकारली.


तिचे पुढारी लाच घेऊन न्याय करतात, तिचे याजक किंमत घेऊन शिकवितात, व तिचे संदेष्टे पैशासाठी भविष्य सांगतात. तरीही ते याहवेहच्या मदतीसाठी आसुसलेले असतात आणि म्हणतात, “याहवेह आपल्यामध्ये नाहीत काय? आमच्यावर कोणतेही संकट येणार नाही.”


याहवेह असे म्हणतात: “माझ्या लोकांना चुकीच्या मार्गाने नेणारे संदेष्टे, त्यांना काही खायला मिळाल्यास ते ‘शांती’ ची घोषणा करतात. परंतु जो त्यांना खाण्याचे देण्यास नकार देतो त्याच्याशी युद्ध करण्यास सुसज्ज राहतात.


“ ‘प्रभूचा मेज अशुद्ध आहे’ व ‘त्यावरील अन्न तुच्छ आहे,’ असे सांगून तुम्ही माझे नाम अपवित्र करता.


तेव्हा येशू पेत्राकडे वळून म्हणाले, “अरे सैताना, माझ्या दृष्टिआड हो! तू मला अडखळण आहे. तुझे मन परमेश्वराच्या गोष्टींकडे नाही, परंतु केवळ मनुष्याच्या गोष्टींकडे आहे.”


“नंतर तो त्याच्या डावीकडे असलेल्या लोकांना म्हणेल, ‘अहो शापग्रस्त लोकांनो, तुम्ही माझ्यापुढून निघून जा. सैतान आणि त्याच्या दूतांसाठी जो सार्वकालिक अग्नी तयार ठेवला आहे त्यात जा.


आणि मी स्वतःस म्हणेन, “पुढे अनेक वर्षे पुरेल एवढ्या धान्यांचा तुझ्याकडे साठा आहे. आता विसावा घे; खा, पी आणि आनंद कर.” ’


येशू म्हणाले, “कोणी एक श्रीमंत मनुष्य होता. तो दररोज जांभळी आणि सुंदर वस्त्रे परिधान करीत असे आणि चैनीत राहत असे.


“त्याने काही काळ लक्ष दिले नाही, परंतु शेवटी तो स्वतःशीच म्हणाला, ‘मी परमेश्वराला भीत नाही किंवा लोक काय म्हणतील याची काळजी करीत नाही,


कारण असे लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करीत नाही, तर स्वतःच्या पोटाची करतात. आपल्या गोड व लाघवी भाषणाने, ते भोळ्यांच्या अंतःकरणास भुरळ पाडतात.


ज्यासाठी तुम्हाला आता लाज वाटते त्या गोष्टींपासून त्यावेळी तुम्हाला काय लाभ मिळाला? त्या गोष्टींचा परिणाम तर मरण आहे.


तुम्ही अजूनही दैहिक आहात. तुम्हामध्ये भांडणे आणि मत्सर आहेत, तुम्ही दैहिक आहात की नाही? तुम्ही केवळ सामान्य मानवासारखे वागता की नाही?


आणि तुम्ही अभिमान बाळगता! याउलट दुःखाने ज्या मनुष्याने असे केले, त्याला सहभागितेतून घालवून द्यावयाचे नव्हते का?


तुम्ही गर्व करणे उचित नाही. थोडे खमीर सर्व पिठाच्या गोळ्याला फुगविते, हे तुम्हाला माहीत नाही का?


मी जे करतो ते करीत राहीन, यासाठी की जे आम्ही त्यांच्या समान आहोत असे मानतात व त्याबाबत प्रौढी मिरविण्याची संधी शोधतात त्यांना ती मिळू नये.


मग त्याचे सेवकही नीतिमान असल्याचे ढोंग करतात यात काही नवल नाही. त्यांच्या कृत्यांप्रमाणे त्यांचा शेवट होईल.


ज्यांची सुंता झाली ते सुद्धा नियम पाळीत नाहीत; तरी देखील तुमची सुंता व्हावी ही त्यांची इच्छा आहे, म्हणजे त्यांना तुमच्या दैहिक सुंतेची प्रौढी मिरविता येईल.


इतर प्रत्येकजण स्वतःच्या फायद्याच्या गोष्टी पाहतात, येशू ख्रिस्ताच्या नाही.


तुम्ही आपली अंतःकरणे स्वर्गीय गोष्टींकडे लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका.


सर्वकाळचा नाश ही त्यांची शिक्षा असेल आणि ते प्रभूच्या समक्षतेतून व परमेश्वराच्या गौरव व सामर्थ्यातून कायमचे विभक्त होतील.


आणि ज्या सर्वांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही आणि दुष्टपणात आनंद मानला, त्या सर्वांना दोषी ठरविण्यात येईल.


मग हा अधर्मी पुरुष प्रकट होईल, पण प्रभू येशू त्याला मुख श्वासाने मारून टाकतील आणि आपल्या आगमनाच्या प्रतापाने त्याचा नाश करतील.


आणि ज्यांच्यापासून सत्य हिरावून घेतले आहे आणि ज्यांना भक्ती द्रव्यलोभाचे एक साधन वाटते, अशा भ्रष्ट मनाच्या माणसांमध्ये सतत भांडणे होतात.


विश्वासघातकी, बेपर्वा, अहंकारी, परमेश्वरावर प्रीती करण्याऐवजी सुखोपभोगावर प्रीती करणारे होतील.


जसे आता तुम्ही घमेंड करता आणि अभिमान बाळगता. अशा सर्व प्रकारची बढाई वाईट आहे.


परंतु लोकांमध्ये सुद्धा खोटे संदेष्टे होते, तसेच तुमच्यामध्ये खोटे शिक्षक असतील, ते गुप्त रीतीने विध्वंसक पाखंडी मते प्रचारात आणतील, ज्याने त्यांना विकत घेतले अशा सार्वभौम प्रभूला नाकारतात आणि स्वतःवर आकस्मिक नाश ओढवून घेतील.


त्यांनी केलेल्या हानीचे प्रतिफळ त्यांच्या पदरी पडेल. दिवसाच्या प्रकाशात चैनबाजी करण्यात ते आनंद मानतात, ते डाग व कलंक आहेत. तुमच्याबरोबर मेजवान्या करताना ते फसवेगिरीने वागतात व त्यात त्यांना मौज वाटते.


हे शिक्षक त्यांच्या लोभापायी बनावट गोष्टी सांगून तुमच्याकडून पैसे मिळवतील. त्यांच्यासाठी नेमलेला दंड दीर्घकाळापासून त्यांच्यावर लटकत आहे आणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही.


तरी हे लोक जे काही त्यांना समजत नाही त्याची निंदा करतात आणि ज्यागोष्टी त्यांना उपजत स्वभावाने समजतात—जसे अविवेकी प्राणी करतात—त्यायोगे ते नाश करून घेतील.


हे लोक कुरकुर करणारे आणि दोष शोधणारे आहेत; वाईट वासनांच्या मागे लागणारे, स्वतःची बढाई मारणारे आणि स्वतःच्या लाभासाठी इतरांची खुशामत करणारे आहेत.


ज्यांच्यासाठी दंडाज्ञा फार पूर्वीच लिहून ठेवलेली होती असे काही लोक गुप्तपणे तुमच्यामध्ये आत शिरले आहेत. हे अनीतिमान लोक, परमेश्वराची कृपा विकृत करून तिला अनैतिकतेचे स्वरूप देतात आणि येशू ख्रिस्त आपल्या एकाच सार्वभौम प्रभूला नाकारतात.


तिने आपले सगळे आयुष्य विलासात आणि ऐषआरामात घालविले आहे, आता त्याच मानाने तिला यातना आणि दुःख द्या. ती आपल्या अंतःकरणात बढाया मारून म्हणते, “मी महाराणी होऊन माझ्या सिंहासनावर बसलेली आहे. मी काही विधवा नाही. मला कधीच दुःखाचा अनुभव येणार नाही.”


त्या पशूला आणि त्याच्याबरोबर त्या खोट्या भविष्यवाद्याला कैद करण्यात आले. हा खोटा संदेष्टे, पशूच्या वतीने आपल्या चमत्कारांनी ज्यांनी त्या पशूची खूण धारण केली होती आणि जे त्याच्या मूर्तीची उपासना करीत असत, त्यांना फसविले होते. त्या दोघांनाही गंधकाने सतत जळत राहणार्‍या अग्नीच्या सरोवरात जिवंत टाकण्यात आले.


परंतु भेकड, विश्वासहीन, अशुद्ध, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक व सर्व लबाड—अशा माणसांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. हेच ते दुसरे मरण होय.”


नगराच्या बाहेर कुत्रे व जादूटोणा करणारे, जारकर्मी, खुनी, मूर्तिपूजक, ज्यांना लबाडी प्रिय आहे असे लबाडी करणारे सर्वजण राहतील.


माझे जे यज्ञ व अर्पणे मी माझ्या मंदिरासाठी नेमून दिली आहेत त्याचा तुम्ही अवमान का करता? माझ्या इस्राएली लोकांनी केलेल्या अर्पणातून सर्वोत्तम भाग खाऊन तू स्वतःला पुष्ट करून माझ्यापेक्षा तुझ्या पुत्रांचा जास्त सन्मान का करतो?’


Follow us:

Advertisements


Advertisements