Biblia Todo Logo
Online Bible

- Advertisements -




फिलिप्पैकरांस 3:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 मी सर्वकाही मिळविले किंवा माझ्या ध्येयाप्रत पोहोचलो आहे असे नाही, परंतु ते आपलेसे करण्यासाठी व घट्ट धरून ठेवण्यासाठी मी नेटाने पुढे जात आहे. कारण मला ख्रिस्त येशूंनी पकडून ठेवले आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 एवढ्यातच मी मिळवले, किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो आहे असे नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले ते मी आपल्या कह्यात घ्यावे म्हणून मी त्याच्यामागे लागतो आहे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 मी आताच जणू मिळवले आहे किंवा मी आताच पूर्ण झालो आहे असे नाही. पण मी ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या ताब्यात घेतले ते मी आपल्या ताब्यात घ्यावे म्हणून मी त्याच्यामागे लागलो आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 एवढ्यातच मी मिळवले आहे किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो आहे, असा दावा मी करीत नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला त्याचे म्हणून स्वीकारले, ते मी माझे करून घ्यावे म्हणून मी झटत आहे.

See the chapter Copy




फिलिप्पैकरांस 3:12
44 Cross References  

तरीही, नीतिमान आपल्या मार्गात स्थिर राहतील, आणि शुद्ध हृदयाचे लोक अधिक बलवान होत जातील.


अहा, तुमचे नियम पाळण्यास माझे आचरण नेहमी स्थिर असते तर किती बरे झाले असते!


याहवेह माझे निर्दोषत्व सिद्ध करतील; परमेश्वरा, तुमची करुणा सनातन आहे— आपल्या हस्तकृतीचा त्याग करू नका.


हरणी जशी पाण्यासाठी उत्कट लालसा करते, तसा हे परमेश्वरा, माझा जीव तुमच्यासाठी उत्कट लालसा करीत आहे.


मी तुम्हाला बिलगून राहतो; तुमचा उजवा हात मला सावरून धरतो.


याहवेह तुमच्या अंगणाच्या उत्कंठेने मी, मूर्छित होईपर्यंत आतुर झालो आहे; माझा जीव व माझा देह जिवंत परमेश्वराला आरोळी मारीत आहे.


न्यायनिवाडा पुन्हा न्यायीपणानेच होईल, आणि नीतिमान हृदयाचे त्याचे पालन करतील.


नीतिमान मनुष्याचा मार्ग सकाळच्या सूर्याप्रमाणे आहे, दुपारपर्यंत अधिकच तेजस्वी होणाऱ्या प्रकाशाप्रमाणे तो आहे.


“तुम्ही, ज्यांनी नीतिमत्तेचा ध्यास घेतला आहे व जे याहवेहचा शोध घेता, ते सर्वजण, माझे ऐका: ज्या खडकातून तुम्हाला कापून काढले, आणि ज्या खाणीतून तुम्हाला खोदून काढले, त्याकडे बघा;


चला, याहवेहचा आपण स्वीकार करू या; चला, त्यांचा स्वीकार करण्यास आपण झटू या. सूर्याचे उगविणे जसे निश्चित आहे, तसेच त्यांचे प्रकट होणे निश्चित आहे; हिवाळ्यातील पावसाप्रमाणे, पृथ्वीला सिंचन घालणाऱ्या वसंतऋतूप्रमाणे ते आमच्याकडे येतील.”


म्हणून जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे, तसे तुम्हीही परिपूर्ण असावे.”


परंतु प्रभू हनन्याला म्हणाले, “जा! कारण गैरयहूदी व त्यांचे राजे आणि त्याचप्रमाणे इस्राएली लोक यांच्याकडे माझे नाव जाहीर करण्यासाठी तो माझे निवडलेले पात्र आहे.


अथवा उंची, खोली आणि सृष्टीमधील कोणतीही गोष्ट आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामधील परमेश्वराच्या प्रीतीपासून आपणास विभक्त करू शकणार नाही.


परंतु पूर्णत्वाचे आगमन झाल्यावर, जे अपूर्ण आहे ते नाहीसे होईल.


कारण आपण आता केवळ आरशात प्रतिबिंब पाहत आहोत; नंतर आपण समोरासमोर पाहणार आहोत. मला आता केवळ अंशतः कळते; नंतर मला सर्वकाही स्पष्ट असे दिसेल, जशी माझी संपूर्ण ओळख झाली आहे.


शर्यतीत प्रत्येकजण धावतो, परंतु फक्त एकाच व्यक्तीला बक्षीस मिळते हे तुम्हाला माहीत नाही का? अशा रीतीने धावा की ते बक्षीस तुम्हाला मिळेल.


तुम्ही सबळ आहात पण आम्ही अशक्त आहोत यात आम्हाला आनंद आहे. आमची प्रार्थना हीच आहे की तुम्हाला पूर्णत्व प्राप्त व्हावे.


यास्तव, आपल्याला अशी अभिवचने मिळाली आहेत, म्हणून प्रिय मित्रांनो देहाला व आत्म्याला अशुद्ध करणार्‍या सर्व गोष्टींपासून आपण स्वतःला शुद्ध करू या आणि परमेश्वराविषयी आदरयुक्त भय बाळगून आपल्या पवित्रतेला सिद्ध करू या.


दैहिक इच्छा आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहाविरुद्ध आहे. ते आपसात विरोधी आहेत, यासाठी की ज्यागोष्टी तुम्ही केल्या पाहिजे त्या तुम्ही करू नये.


आम्ही त्यांच्या दृष्टीने पवित्र आणि निष्कलंक असावे म्हणून त्यांनी जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्तामध्ये प्रीतीमुळेच निवडले.


हे यासाठी की त्यांच्या लोकांना सेवेच्या कार्यात सिद्ध करून ख्रिस्ताचे शरीर सुसज्ज व्हावे.


ख्रिस्त येशूंचे दास पौल व तीमथ्य, यांच्याकडून फिलिप्पै शहरातील ख्रिस्त येशूंमध्ये असणारे सर्व परमेश्वराचे पवित्र लोक, अध्यक्ष व मंडळीचे सेवक यास:


जसे येथवर आपण पोहोचलो आहोत त्याप्रमाणे चालत राहावे.


कारण वास्तविक सुंता झालेले आपणच आहोत आणि जे आपणही आत्म्याद्वारे परमेश्वराची सेवा करतो व ख्रिस्त येशूंमध्ये अभिमान बाळगतो आणि देहावर भरवसा ठेवत नाही.


यापेक्षाही अधिक, ख्रिस्त येशू माझे प्रभू, यांच्या सर्वश्रेष्ठ ज्ञानासाठी मी सर्वकाही हानी असे समजतो व त्यासाठी मी सर्वगोष्टी गमावल्या आहेत व मी त्या कचर्‍यासमान लेखतो यासाठी की ख्रिस्त मला प्राप्त व्हावे.


कोणी वाईटाची फेड वाईटाने करणार नाही याची काळजी घ्या, परंतु प्रत्येकाचे आणि सर्वांचे सर्वदा चांगले करण्यासाठी झटा.


परंतु प्रभूला प्रिय असलेल्या बंधू आणि भगिनींनो, आम्ही तुमच्यासाठी परमेश्वराची सतत उपकारस्तुती केली पाहिजे, कारण परमेश्वराने तुम्हाला आत्म्याद्वारे होणार्‍या पवित्रीकरणाच्या कार्यात व सत्यावरील विश्वासात प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे.


जिच्या चांगल्या कामाबद्दल ती प्रसिद्ध आहे, म्हणजे जिने आपल्या मुलाबाळांचे चांगले संगोपन केले असेल, जिने आतिथी सत्कार केलेला असेल, जिने प्रभूच्या लोकांचे पाय धुतले असतील, संकटात पडलेल्या लोकांना मदत केली असेल आणि सर्वप्रकारच्या चांगल्या कामासाठी समर्पित केले असेल, तिचे नाव विधवांच्या यादीत लिहावे.


अशाप्रकारे, ही संपत्ती त्यांच्या भावी युगाच्या पायाभरणीसाठी खर्च केली जाईल, जेणेकरून जे जीवन जगू शकतील ते वास्तव आहे.


सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा व पवित्र होण्याचा झटून प्रयत्न करा; पवित्रतेशिवाय कोणीही प्रभूला पाहू शकत नाही.


मंडळीतील प्रथम जन्मलेले, ज्यांची नावे स्वर्गात नोंदलेली आहेत त्या मंडळीत तुम्ही आला आहात. सर्वांचा न्याय करणाऱ्या परमेश्वराजवळ, परिपूर्ण केलेल्या नीतिमानांच्या आत्म्याजवळ तुम्ही आला आहात.


यांना मेलेल्यातून माघारी आणले, ते परमेश्वर त्यांच्या दृष्टीने जे योग्य ते आपल्यामध्ये येशू ख्रिस्ताद्वारे करोत व प्रत्येक कामात त्यांना संतोषविण्यास तुम्हाला सिद्ध करो. त्यांना सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.


आपण सर्वजण अनेक प्रकारे अडखळतो. जर कोणी बोलण्यात कधीही चुकत नाही, तर तो परिपूर्ण आहे व आपले सर्व शरीर ताब्यात ठेवण्यास समर्थ आहे.


तुम्ही थोडा वेळ दुःख सहन केल्यावर, सर्व कृपेचे परमेश्वर ज्यांनी तुम्हाला त्यांच्या सार्वकालिक गौरवामध्ये येण्यासाठी ख्रिस्तामध्ये आमंत्रित केले आहे, ते स्वतः तुमची पुनर्स्थापना करतील आणि तुम्हाला सशक्त, दृढ आणि स्थिर करतील.


परंतु आपले प्रभू आणि तारणारे येशू ख्रिस्त यांच्या कृपेत आणि ज्ञानात वाढत राहा. त्यांना गौरव आता आणि सदासर्वकाळ असो! आमेन.


Follow us:

Advertisements


Advertisements