Biblia Todo Logo
Online Bible

- Advertisements -




फिलिप्पैकरांस 2:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 इतर प्रत्येकजण स्वतःच्या फायद्याच्या गोष्टी पाहतात, येशू ख्रिस्ताच्या नाही.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 कारण सर्व जण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नसतात;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 कारण, सगळे स्वतःच्याच गोष्टी पाहतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नाहीत.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 इतर सर्व जण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नसतात,

See the chapter Copy




फिलिप्पैकरांस 2:21
19 Cross References  

परंतु यहोआश राजाच्या कारकिर्दीतील तेवीस वर्षापर्यंत याजकांनी मंदिराची डागडुजी केली नव्हती.


ते कुत्र्याप्रमाणे खूप खादाड आहेत; त्यांची तृप्ती कधीही होत नाही. ते असमंजस मेंढपाळ आहेत; ते सर्व आपल्याच मर्जीने चालतात, केवळ स्वतःच्या स्वार्थाची काळजी घेतात.


“अहा, तुमच्यापैकी कोणीतरी मंदिराची दारे बंद करावी, म्हणजे तुम्ही माझ्या वेदीवर निरर्थक धूप जाळणार नाही! मी तुमच्यावर मुळीच प्रसन्न नाही, आणि तुमच्या हातातील अर्पणांचा स्वीकार करणार नाही.” सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात.


मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “जर कोणी माझा शिष्य होऊ पाहतो तर त्याने स्वतःस नाकारावे, त्याचा क्रूसखांब उचलावा आणि माझ्यामागे यावे.


“जो कोणी माझ्याकडे येतो आणि जर आपले आईवडील, पत्नी आणि मुले, भाऊ व बहिणी किंबहुना स्वतःच्या जिवाचाही द्वेष करणार नाही तर तो माझा शिष्य होऊ शकणार नाही.


आता पौल आणि त्याचे सहकारी यांनी पाफोस शहर सोडले व ते तारवात बसून पंफुल्यातील पेर्गा येथे आले, या ठिकाणी योहानाने त्यांचा निरोप घेतला व तो यरुशलेमला परतला.


परंतु पौलाला त्याला बरोबर नेणे सुज्ञपणाचे वाटले नाही, कारण मार्क त्यांना पंफुल्यामध्ये सोडून गेला होता आणि या कार्यात पुढे जाण्यासाठी त्याने साथ दिली नव्हती.


कोणी स्वतःचे हित पाहू नये, तर दुसर्‍याचेही पाहावे.


मी सर्वप्रकारे सर्वांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो. मी स्वतःचे भले पाहत नाही परंतु अनेकांचे भले पाहतो यासाठी की त्यांचे तारण व्हावे.


ती कधीही इतरांचा अपमान करीत नाही, स्वार्थ पाहत नाही किंवा सहज चिडत नाही. ती अयोग्य गोष्टींची कधीही नोंद ठेवीत नाही.


ज्याप्रकारे आम्ही ख्रिस्ताच्या अगणित दुःखांमध्ये सहभागी आहोत, त्याच प्रकारे आमचे सांत्वनही ख्रिस्ताद्वारे विपुल होते.


तुम्ही केवळ स्वतःचेच हित नव्हे, तर इतरांचेही हित पाहावे.


आशियातील सर्व विश्वासी माझ्यापासून दूर गेले आहे, हे तुला माहीतच आहे. त्यामध्ये फुगलस आणि हर्मगनेस हे देखील आहेत.


लोक स्वार्थी, धनलोभी, गर्विष्ठ, बढाईखोर, परमेश्वराचा उपहास करणारे, मातापित्यांची अवज्ञा करणारे, दयाहीन, अपवित्र,


कारण देमासाने जगावर प्रीती केल्याने, मला सोडून तो थेस्सलनीकास गेला आहे. क्रिसेन्स गलातीयास व तीत दालमतियास गेले आहेत.


माझ्या पहिल्या सुनावणीच्या वेळी कोणीही माझ्याबरोबर नव्हते, प्रत्येकाने माझा त्याग केला; याचा दोष त्यांच्यावर येऊ नये.


Follow us:

Advertisements


Advertisements