Online Bible

- Advertisements -




यिर्मया 47:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2-3 याहवेह हे असे म्हणतात: “पाहा, उत्तरेकडून जलस्तर उफाळून येत आहे; तो प्रचंड प्रवाहात परिवर्तित होईल. जो त्यांच्या भूमीला व तेथील सर्व गोष्टीला आच्छादित करेल म्हणजे त्यात असणारी नगरे व तिथे राहणारे. लोक किंकाळ्या मारतील; त्या भूमीवरील सर्व रहिवासी विलाप करतील. कारण त्यांच्या वेगाने धावणाऱ्या घोड्यांच्या टापांचा आवाज, शत्रूंच्या रथाचा आवाज आणि त्यांच्या चाकांचा खडखडाट ऐकू येत आहे. त्यांचे पालक वळून त्यांच्या मुलांना मदत करू शकणार नाहीत; त्यांचे हात गळून गेल्यागत झाले आहेत.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “परमेश्वर म्हणतो, पाहा, उत्तरेकडून पाणी चढत आहे, त्याचा मोठा लोंढा बनत आहे; देश व त्यातील सर्वकाही, नगर व त्यातले रहिवासी ह्या सर्वांना तो तुडवील; लोक आक्रोश करतील, देशातले सर्व रहिवासी हायहाय करतील.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, उत्तरेला पुराचे पाणी चढत आहे. ते तुडूंब भरून वाहणाऱ्या नदीप्रमाणे होत आहे! मग देश व त्यातील सर्वकाही, नगरे आणि त्यातील रहिवासी यांना ते बुडवून टाकतील. म्हणून प्रत्येकजण मदतीसाठी आक्रोश करतील, आणि त्या देशात राहणारे सर्व विलाप करतील.

See the chapter Copy




यिर्मया 47:2

Follow us:

Advertisements


Advertisements