यिर्मया 46:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 ते पुन्हापुन्हा अडखळतील; ते एकमेकांवर कोसळून पडतील. ते म्हणतील, ‘चला, उठा, आपल्या लोकांकडे व आपल्या जन्मभूमीत आपण परत जाऊ, या छळवाद्यांच्या तलवारीपासून दूर जाऊ.’ See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 परमेश्वराने पुष्कळांना ठेचा खाण्यास लावले; ते एकावर एक पडले; ते म्हणाले, ‘उठा, आपण ह्या पिडणार्या तलवारींपासून निभावून आपल्या लोकांकडे परत जाऊ; आपल्या मातृभूमीस जाऊ.’ See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 जे कोणी अडखळतील त्यांची संख्या वाढवली आहे. प्रत्येक सैनिक एकावर एक पडले. ते म्हणत आहेत, उठा, आपण या पीडणाऱ्या तलवारीपासून जी आपणाला मारून खाली पाडत आहे, तिच्यापासून पळून आपल्या स्वतःच्या लोकांकडे, आपल्या मातृभूमीला परत जाऊ. See the chapter |