यिर्मया 37:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 मग राजा सिद्कीयाहने यिर्मयाहला मुक्त केले व राजवाड्यात आणले, आणि खाजगीरित्या विचारले, “याहवेहकडून काही वचन आले आहे काय?” यिर्मयाह उत्तरला, “होय, तुम्हाला बाबेलच्या राजाच्या हातात सोपविण्यात येणार.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मग सिद्कीया राजाने त्याला बोलावून आणले; तेव्हा राजाने आपल्या राजवाड्यात त्याला एकान्ती विचारले की, “परमेश्वराकडचे काही वचन आहे काय?” यिर्मया म्हणाला, “आहे.” मग तो म्हणाला, “आपणांला बाबेलच्या राजाच्या हाती देण्यात येईल.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मग सिद्कीया राजाने कोणाला तरी बोलाविणे पाठवून त्यास राजावाड्यात आणले. त्याच्या घरात राजाने एकांतात त्यास विचारले, “परमेश्वराकडून काही वचन आहे का?” यिर्मया म्हणाला, “आहे, व पुढे म्हणाला, तुला बाबेलाच्या राजाच्या हाती दिले जाईल.” See the chapter |