यिर्मया 14:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 एखाद्या विस्मित झालेल्या व्यक्तीसारखे तुम्ही का आहात? एखाद्या तारण ने करणाऱ्या वीरासारखे का झालात? हे याहवेह, तुम्ही तर येथेच आमच्यामध्ये आहात, आम्ही तुमचे नाव धारण केले आहे; आमचा त्याग करू नका! See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 स्तब्ध झालेल्या मनुष्यासारखा, वीर असून उद्धार करण्यास असमर्थ अशा पुरुषासारखा का झालास? तरी हे परमेश्वरा, तू आमच्यामध्ये आहेस, तुझे नाम आम्हांला दिलेले आहे; आमचा त्याग करू नकोस.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जो वाचवू शकत नाही अशा वीर योद्ध्याप्रमाणे तू का गोंधळात आहेस? कारण परमेश्वरा, तू आमच्याबरोबर आहेस. आम्ही तुझ्या नावाने ओळखले जातो, आम्हास सोडून जाऊ नकोस.” See the chapter |