२ शमुवेल 11:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 नंतर दावीद उरीयाहला म्हणाला, “तुझ्या घरी जा आणि आपले पाय धू.” तेव्हा उरीयाह राजवाड्यातून निघाला आणि त्याच्यामागोमाग राजाकडून एक बक्षीस पाठवले गेले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मग दावीद उरीयाला म्हणाला, “आपल्या घरी जा व हातपाय धू,” उरीया राजमंदिरातून निघाला व त्याच्या पाठोपाठ राजाकडून त्याला काही इनाम गेले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मग दावीद उरीयाला म्हणाला, घरी जा आणि आराम कर उरीया महालातून बाहेर पडला त्यानंतर त्याच्यासाठी राजातर्फे भेट पाठवण्यात आली. See the chapter |