२ इतिहास 7:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 याजकांनी आपआपले स्थान ग्रहण केले, दावीद राजाने याहवेहची स्तुती करण्यासाठी व “त्यांची प्रीती सर्वकाळ टिकून राहते” असे म्हणत आभार मानले होते, तेव्हा जशी संगीतवाद्यांची रचना केली होती आणि त्यांचा उपयोग केला होता, तशाच प्रकारे लेवी लोकांनीही स्थान ग्रहण केले. लेव्यांच्या समोरच्या बाजूला याजकगण त्यांचे रणशिंग वाजवित होते आणि सर्व इस्राएली लोक उभे होते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 याजक आपापल्या स्थानी उभे राहिले; परमेश्वराची दया सनातन आहे असे लेव्यांच्या द्वारे परमेश्वराचे उपकारस्मरण करण्यासाठी जी वाद्ये दावीद राजाने परमेश्वराप्रीत्यर्थ केली होती ती घेऊन लेवीही उभे राहिले; त्यांच्यापुढे याजक कर्णे वाजवू लागले आणि सर्व इस्राएल लोक उभे राहिले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 याजक आपल्या कामाला सिध्द झाले. परमेश्वराच्या भजनाची वाद्ये घेऊन लेवीही उभे राहिले. राजा दाविदाने ही वाद्ये परमेश्वराच्या स्तवनासाठी करून घेतली होती. “परमेश्वराचे स्तवन करा कारण त्याची कृपा सनातन आहे” असे याजक आणि लेवी गात होते. लेवीच्या समोर उभे राहून याजक कर्णे वाजवत होते. सर्व इस्राएल लोक तिथे उभे होते. See the chapter |