२ इतिहास 7:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तर इस्राएलवरचे तुझे राजासन मी सर्वकाळासाठी प्रस्थापित करेन, तुझा पिता दावीदाशी करार करीत म्हटले होते, ‘इस्राएलवर राज्य करण्यास तुझा वारस कधीही खुंटणार नाही.’ See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तर ‘इस्राएलाच्या गादीवर आरूढ होणार्या तुझ्या कुळातल्या पुरुषांची परंपरा खुंटायची नाही,’ असा जो करार मी तुझा बाप दावीद ह्याच्याशी केला त्याप्रमाणे मी तुझे राजपद स्थापीन. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 तर मी तुला समर्थ राजा बनवील आणि तुझे राज्य महान होईल. तुझे पिता दावीद यांना मी तसे वचन दिले आहे. त्यांना मी म्हटले होते, ‘दावीद तुझ्या घराण्यातील पुरुषच इस्राएलाच्या राजपदावर आरुढ होईल.’ See the chapter |